पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काल (दि. 21 ) पुण्यातील मोठे उद्योगपती पुनित बालन (Punit Balan) यांनी भेट घेतली. बालन आणि पवारांच्या या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली याचे खरे कारण समोर आले आहे.
हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन; पुनीत बालन यांच्या हस्ते लोगोचे झालं अनावरण
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या विधी महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. संबंधित संस्थेने इमारत बांधकामसाठी माझ्याकडून मदत मिळावी अशी विनंती केली होती. त्याबाबत चर्चा करण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचे पुनित बालन यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितले आहे.
राज्यातील राष्ट्रीय ज्यूदोपटूंच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्य करू; पुनीत बालन ग्रुपने दिलं आश्वासन
आगामी काळात पुण्यासह अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यात अचानक बालन यांनी अचानक पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही भेट इमारतीच्या मदतीसाठीच होती हे आता स्पष्ट झाले आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, माझे सर्वच राजकीय पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या भेटीचा कुणीही वेगळा अर्थ काढू नये असेही बालन यांनी म्हटले आहे.