पुणे : नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकने (Pune Corporation) प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांना नोटीस काढत तब्बल तीन कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. पाठवण्यात आलेल्या या दंडात्मक नोटीसीला बालन यांनी आज (दि. 25) प्रत्युत्तर दिले असून, यात त्यांनी दिलेली नोटीस चुकीची व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच सदर नोटीस तुम्ही मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करण्याकरिता काढत गैरहेतूने पत्रकारांनादेखील दिल्याचा आरोप केला आहे. (Punit Balan Response To PMC Notice )
Maratha Reservation : ‘दिल्लीवरुन आता निर्णयच घेऊन या’; जरांगे पाटलांनी शेवटचं सांगितलं
बालन यांनी नोटीशीला दिलेले प्रत्युत्तर नेमकं काय?
तुम्ही दिलेली सदर नोटीस चुकीची व बेकायदेशीर असून सदर नोटीस तुम्ही मंडळाना देण्याऐवजी तुम्ही जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामीकरीता माझ्या नावे नोटीस दिली आहे, तसेच गैरहेतूने पत्रकारांना देखील दिल्याचे बालन यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे.तसेच, सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14/09/2023 रोजी बैठक घेवून निर्णय घेतल्याचे दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रात आल्याचे बालन यांनी म्हचले आहे.
तसेच तुमचे पत्र जावक क्रमांक ई / 5746 दिनांक 04 / 01 / 2023 सदर उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय मुख्य इमारत, मुंबई यांच्याकडे सादर केलेल्या पत्रामध्ये तुम्ही नमूद केले आहे की, पुणे शहरातील गणेशउत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप / स्टेज करिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच सन 2019 पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील पुणे, महानगरपालिका मुख्य सभा ठराव क्रमांक 564 दिनांक 09/09/0219 अन्वये रद्द करण्यास मान्यता दिलेली असून, त्याबाबत सन 2019 पासून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे नमुद केले आहे.
Gujrat News : मुलीचं बक्षीस जिंकणं वडिलांच्या जीवावर बेतलं; गरबा कार्यक्रमात असं काय घडलं?
पुणे शहरात सन 2019 गणेशोउत्सव कालावधीत मोहरम / दहीहंडी आणि गणेशउत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील 5 वर्षा करिता म्हणजेच सन 2022 पासून सन 2027 सालापर्यंत गृहीतधरणे बाबत पुणे महानगरपालिका, पुणेकडून सार्वजनिक गणेशउत्सव 2022 करिता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी यांची दिनांक 08/08/2022 रोजी झालेल्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता तुम्ही पाठवलेली नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून मला पाठवली आहे. तसेच तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा व आयोग्य असून त्यानुसार आपण क्रमांक एल-1043 दिनांक 03/10/2023 ची आमच्या कार्यालयात दिनांक 04/10/2023 रोजी देण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात यावी तसेच सदर नोटीस रद्द केल्या बाबत प्रसारमाध्यमांना देखील कळवण्याची विनंती बालन यांनी महापालिकेकडे केली आहे. सबब, ज्याअर्थी या शासनानेच “निर्बंधमुक्त” उत्सवाची घोषना केलेली आहे. त्याअर्थी आपणा दंड / विद्रुपीकरण शुल्क इत्यादिची मागणी आमच्याकडे करणे बेकायदेशीर व चुकीचे आहे. तसेच अश्या वसुली मिळकतकरातून करण्याबाबत उल्लेख देखील बेकायदेशीर आहे याचीही नोंद घ्यावी असेदेखील पुनीत बालन यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे.