Download App

आजपासून पिंपरी चिंचवड मनपाचा ‘पर्पल जल्लोष’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पर्पल जल्लोष हा महोत्सव अपंगांची प्रतिभा आणि त्यांच्या नवकल्पनांना वाव देणारा, तसंच, अपंगांच्या क्षमतांमध्ये वाढ करणारा उपक्रम आहे.

  • Written By: Last Updated:

Purple Jallosh Festival In Chinchwad : महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने अपंगांना मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘पर्पल जल्लोष-दिव्यांगांचा महाउत्सव‘ साजरा करण्यात येणार आहे. (Festival ) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवाला आजपासून (१७ जानेवारी) सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.

महापारेषण पिंपरी चिंचवड येथे नोकरीची संधी, 23 पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

‘पर्पल जल्लोष हा महोत्सव अपंगांची प्रतिभा आणि त्यांच्या नवकल्पनांना वाव देणारा, तसंच, अपंगांच्या क्षमतांमध्ये वाढ करणारा उपक्रम आहे. सामाजिक विकासातील अडथळे दूर करण्यास चालना देणं, अपंगांबाबत समाजात असलेल्या प्रचलित विचारांविषयी प्रबोधन करणं, अपंग व्यक्तींविषयी समाजात असलेले नकारात्मक समज बदलण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यांचे सर्वांगीण समावेशन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं, हा महोत्सवाचा हेतू आहे असं आयुक्त शेखर सिंह म्हणाले,

अपंगांसाठी कार्यरत असलेल्या ४० पेक्षा जास्त स्टार्टअप, विविध काॅर्पोरेट कंपन्या आणि विविध संस्था सहभागी होणार आहेत. तसंच, या महोत्सवात नृत्य, गायन, अभिनय, कविसंमेलन, गप्पा लेखकांशी, गझलरंग, कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद, कवी कट्टा, फॅशन-शो यांसारखे विविध कार्यक्रम होणार आहेत. अपंगांच्या जीवनावर आधारित लेखन, साहित्य त्यांच्या प्रेरणादायी कथा आणि प्रवासाचा उलगडा करणारे विशेष सत्रदेखील होणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केलं.

follow us