पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मोठा गोंधळ झाला आहे.काँग्रेस कार्यकर्ते भाजपच्या शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना पुस्तक भेट देण्यासाठी जाणार होते. मात्र, मध्येच पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवलं आहे. या काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनमध्येच पोलिसांनी अडवलं आहे.
Pune News: 'राजवाडा' शब्दावरून पुण्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये राडा…#PuneNews #Congress #BJP pic.twitter.com/Sc6DTpPynt
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 1, 2023
पुण्यातल्या काँग्रेस भवनाचा भाजपने राजवाडा म्हणून उल्लेख केला होता. याविरोधात राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज भाजप कार्यालयावर धडक देऊन काँग्रेस भवनाचा राजवाडा उल्लेख केल्यासंबंधीचं पुस्तक भेट देणार होते.
वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी; गॅसच्या दरात मोठी घट
मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी मध्येच अडवलं आहे. यावेळी काँग्रेसकडून भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनूसुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त काँग्रेस भवनमध्ये तैनात केला आहे.
आंदोलक कुस्तीपटूंची मागणी मान्य होणार? राज ठाकरेंचे PM मोदींना पत्र
पुणे शहर भाजपच्या सोशल मीडियाच्या पेजवर पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनचा राजवाडा असा उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक काँग्रेस भवनाच्या इतिहासाचं पुस्तक भाजपच्या शहराध्यक्षांना भेट देऊन त्यांनी खरा इतिहास काय आहे हे त्यांना माहित असावं, त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांच्याकडे जात असल्याचं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयाकडे निघताच पोलिसांनी त्यांना काँग्रेस भवनमध्येच रोखलं आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असूनही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाबरुन भाजपचे नेते कार्यालयाला पळून गेले असल्याचा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. राजवाडा शब्दांवरुन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पवित्र्यावर आता भाजपचे पदाधिकारी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.