Chinchwad Bypoll अर्ज भरताच राहुल कलाटेंची सुनील शेळकेंवर खोचक टीका!

पिंपरी : महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinwad Bypoll) उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना भेटलो. पण त्यांनी उमेदवारी दिली नाही. ते स्वतःला लोकनायक म्हणून घेतात. मात्र, त्यांना चिंचवडमध्ये जनभावना काय आहे, हेच माहिती नसल्याने त्यांनी मला उमेदवारी दिली नाही. परंतु, ते स्वतःला लोकनायक म्हणवून घेतात, […]

Rahul Kalate Sunil Shelke

Rahul Kalate Sunil Shelke

पिंपरी : महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinwad Bypoll) उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना भेटलो. पण त्यांनी उमेदवारी दिली नाही. ते स्वतःला लोकनायक म्हणून घेतात. मात्र, त्यांना चिंचवडमध्ये जनभावना काय आहे, हेच माहिती नसल्याने त्यांनी मला उमेदवारी दिली नाही. परंतु, ते स्वतःला लोकनायक म्हणवून घेतात, असा खोचक टोला आमदार शेळके यांना अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी लगावला.

Nana Patole : नाना पटोले आणि वाद हे समीकरण अविभाज्य आहे का? | LetsUpp Marathi

राहुल कलाटे म्हणाले की, मला उमेदवारी मिळावी म्हणून महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना भेटलो. तसेच आमदार सुनील शेळके यांनाही भेटलो. परंतु, मला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे मी चिंचवड पोटनिवडणुकीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज भरताना तुमच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष होते. मग तुम्हाला शिवसेनेचा मिळेल का, यावर उत्तर देताना राहुल कलाटे म्हणाले, मला शिवसेनेतील नेत्यांचा जरी पाठिंबा मिळाला नाही तरी सामान्य शिवसैनिक हे माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे ही निवडणूक मीच जिंकणार असा दावा कलाटे यांनी यावेळी केला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी मी अर्ज माघारी घेणार नाही. मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. प्रत्यक्ष मतदानातून चिंचवडची जनता कोणाच्या बाजूने आहे. हे सर्वांनाच दिसून येईल, असे देखील राहुल कलाटे यावेळी म्हणाले.

Exit mobile version