Khadakwasla Fursungi Tunnel Pune Ring Road Rahul Kul: पुणे : दौंड, हवेली आणि इंदापूर तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत बोगदा प्रकल्पासह पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या पुणे रिंग रोडच्या कामाची विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने पाहणी केली. समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली ही पाहणी करण्यात आली.
एसटीच्या NCMC कार्डबाबत मोठा निर्णय! आता 50 रुपयांची अट संपली, फक्त 5 रुपयांतही करता येणार रिचार्ज
खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या मुठा उजव्या कालव्याऐवजी सुमारे 28 किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा उभारण्यात येत आहे. सुमारे 2,190 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात ‘हॉर्स शू’ आकाराचा बोगदा तयार केला जात असून, त्यातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने 1,510 क्युसेक पाणी वाहून नेले जाणार आहे.
यानंतर समितीने पुणे रिंग रोडच्या कामांचीही प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) पश्चिम भागातील विविध पॅकेजमधील कामांची पाहणी करून संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला.
MSRDC कडून सुमारे 169 किलोमीटर लांबीचा रिंग रोड उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 52 हजार 780 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता 110 मीटर रुंद असून, त्याचा डिझाइन वेग ताशी 120 किलोमीटर असणार आहे. प्रकल्पात 16 इंटरचेंज, 14 बोगदे, 36 व्हायाडक्ट आणि 4 रेल्वे उड्डाणपुलांचा समावेश आहे.
परिवर्तनवादी चळवळ जातीवादी होतीये; समाजाचं वाटोळं सुरू, शरणकुमार लिंबाळेंचा परखड प्रहार
समितीने मुठे ते मांडवी बुद्रुक, वरदाडे ते रहाटवडे आणि खेड शिवापूर ते शिवरे या पॅकेजमधील बोगदे, पूल आणि व्हायाडक्टच्या कामांची पाहणी केली. या तिन्ही पॅकेजमधील कामे सध्या सुमारे 42 ते 44 टक्के पूर्ण झाली आहेत.
पुणे रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर शहरातील अवजड वाहतूक बाहेरून वळविणे शक्य होणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होऊन परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
