Rain Alert : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात (Weather Update) हलक्या ते मध्यम स्वरुपाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात पाऊस होत नाही. मात्र, यंदा वेगळी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. काही भागात प्रमाणापेक्षा जास्त थंडी पडली आहे. तर काही ठिकाणी सकाळच्या वेळी प्रचंड धुके असते. राज्यात 5 जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज आहे. तसेच पुण्यात देखील (Pune Rain) पाऊस होईल.
Rain Alert : पावसाचं संकट! नववर्षालाच पाऊस लावणार हजेरी; हवामानाचा अंदाज काय?
जरी पाऊस झाला तरी हा पाऊस जोरदार नसेल आणि सर्वदूरही होणार नाही. काही तुरळक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही. दुसरीकडे राज्यात काही जिल्ह्यात थंडी अनपेक्षितपणे वाढली आहे. नगर जिल्ह्यात यंदा थंडी जास्त वाढली आहे. जिल्ह्यात इतकी थंडी कधी पडत नाही. मात्र, यंदा नगरकर जास्त थंडीचा अनुभव घेत आहेत.
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 5 जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. उत्तर प्रदेश, मध्य प्रदे आणि छत्तीसगड या राज्यांत आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पावसामुळे आतापासूनच ढगाळ हवामान होण्यास सुरुवात झाली आहे.
Weather Update : थर्टी फर्स्टला पाऊस! पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामानाचा अंदाज काय?