Weather Update : थर्टी फर्स्टला पाऊस! पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामानाचा अंदाज काय?
Weather Update : वर्ष संपण्यास दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दिवसांत हवामानात बदल होऊन (Weather Update) थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शक्यतो या दिवसांत पाऊस होत नाही. परंतु, सध्या हवामानाचे चक्रच बिघडले आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त थंडी असे प्रकार घडत आहेत. आता 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागांत पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Rain Alert) व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Weather Update : ऐन थंडीत पाऊसधारा! आज ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब या राज्यांत पाऊस होईल. राज्यातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होईल. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान येथे पाऊस होण्याची शक्यता आहे, असे काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने सांगितले होते.
त्यानंतर आता नवा अंदाज समोर आला आहे. आजपासूनच पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जरी पाऊस झाला तरी हा पाऊस जोरदार नसेल आणि सर्वदूरही होणार नाही. काही तुरळक ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही. दुसरीकडे राज्यात काही जिल्ह्यात थंडी अनपेक्षितपणे वाढली आहे. नगर जिल्ह्यात यंदा थंडी जास्त वाढली आहे. जिल्ह्यात इतकी थंडी कधी पडत नाही. मात्र, यंदा नगरकर जास्त थंडीचा अनुभव घेत आहेत.
नगरकरांनो सावधान! पुढील तीन-चार तासांत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज