Weather Update : पुन्हा ‘अवकाळी’ संकट! राज्यात 48 तासांत पावसाचा अंदाज

Weather Update : पुन्हा ‘अवकाळी’ संकट! राज्यात 48 तासांत पावसाचा अंदाज

Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्याचे (Weather Update) वाटत असतानाच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडूमध्ये 15 ते 17 डिसेंबर तर केरळमध्य 16 ते 18 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीप बेटांवर 17 ते 18 दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Rain Alert : सावधान! ऐन थंडीत मुसळ’धार’ 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

जम्मू काश्मीर, लद्दाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच या भागात हिमवर्षाव होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासांत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांत ढगाळ हवामान राहिल तर काही ठिकाणी थंडीचा जोर वाढणार आहे.

राज्यात पावसाचा जोर ओसरला असून थंडीत वाढ झाली आहे. तरी देखील काही भागांत अजूनही ढगाळ हवामान आहे. तसेच पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांत थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सकाळच्या वेळी प्रचंड थंडी असते. त्यानंतर थंडी कमी होत जाते. अशा हवामानाचा अनुभव नागरिक सध्या घेत आहेत.

Weather Update : पारा 13 अंशांवर, हुडहुडी वाढणार! हवामानाचा अंदाज काय ?

मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम आता कमी झाला आहे. राज्यात ढगाळ हवामान गायब झाले आहे.  पावसाचा जोरही कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका पाऊस होईल. मात्र मुसळधार पावसाचा अंदाज नाही.  या चक्रीवादळाचा इफेक्ट राज्यात आणखी काही दिवस कायम राहणार आहे. थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. आज पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामान स्वच्छ राहिल. परंतु काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहिल असे सांगण्यात आले आहे. पावसाने विश्रांती घेतली असे वाटत असतानाच पुन्हा पावसाचे संकट उभे राहताना दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube