Rain Alert : सावधान! ऐन थंडीत मुसळ’धार’; 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार
Rain Alert : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने (Cyclone Michaung) थैमान घातले आहेत. या वादळामुळे दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून (Weather Update) सध्या थंडी गायब झाली आहे. येत्या 48 तासांत राज्यात जोरदार पावसाची (Rain Alert) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update) आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसणार आहे. आज पूर्व विदर्भात आणि उद्या मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पाऊस होईल. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.
Cyclone Michaung : ‘मिचॉन्ग’चा तडाखा! चेन्नईत 5 जणांचा मृत्यू; आज आंध्रात धडकणार
मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवत आहे. काल राज्यात दिवसभरात ढगाळ हवामान होते. आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात जोरदार पाऊस होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा इफेक्ट राज्यात आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे.
राज्यात या वादळाचा परिणाम दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामान ढगाळ राहिल. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर अन्य ठिकाणी हवामान सामान्य राहिल असा अंदाज आहे.
Rain Alert : सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत होणार गारपीट; हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवेळी झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. रब्बी हंगामातही अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी मागणी पुढे येत आहे. पाऊस अजूनही थांबलेला नाही. आजही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. आज राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे.