Download App

राज ठाकरे घरातून निघाले ही काय ‘ब्रेकिंग न्यूज’ होऊ शकते का? गौरव सोहळ्यात पत्रकारांवरच घसरले

  • Written By: Last Updated:

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सर्वांना परिचित आहे. याचाच प्रत्यय आज पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात आला. यावेळी राज ठाकरेंच्या निशाणाऱ्यावर होती सध्याची पत्रकारिता. सध्या चालवल्या जाणाऱ्या बातम्या आणि सुरू असलेली पत्रकारिता यावर राज यांनी परखड मत व्यक्त करत राज ठाकरे घरातून निघाले ही काय ब्रेकिंग न्यूज होऊ शकते का? असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार गौरव सभारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.

गडकरींच्या मंत्रालयावर ‘कॅग’चे आक्षेप का? बावनकुळेंनी विरोधकांना दिलं टेक्निकल नॉलेज

सध्याची पत्रकारिता म्हणजे हा काय म्हटला अन्…

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, सध्याची पत्रकारिता म्हणजे हा नेता काय म्हटला आणि त्यावर तो नेता काय बोलला? एवढेच सुरू आहे. अशा राजकारण्याला एकट्याला बोंबलू द्या ना शौचालयात. तिथे जे बाहेर पडायच ते माध्यमे समोर आले की त्याच्या तोंडातून बाहेर पडते आणि माध्यमेही वारंवार त्याच्यासमोर आपला बूम घेऊन जातात. तेच लोक बघतात. याला काय पत्रकारिता म्हणायचे? असा सवालही त्यांनी विचारला.

महाराष्ट्रात पत्रकारिता ‘जिवंत’ 

सध्या राजकारणी अतिशय वाह्यात बोलत आहेत. तरीही त्यांची वक्तव्ये प्रसारमाध्यमे वारंवार का दाखवतात? असा सवाल उपस्थित करत पत्रकारिता अजून महाराष्ट्रात जिवंत आहे. सध्याची देशातील पत्रकारिता पाहता जिवंत शब्द वापरला. महाराष्ट्र वेगळा होता, वेगळाच राहणार असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

‘आता ‘सामना’ची आग थांबवावीच लागेल’; फडणवीसांवरील टीका बावनकुळेंनाही झोंबली!

ट्रोल करणाऱ्यांसाठी राजकीय पक्षांनी लोक पाळली

यावेळी राज यांनी एखाद्या बातमीवर किंवा घटनेवर ट्रोल करणाऱ्यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, सध्या राजकारणाची भाषा बदलली आहे. पत्रकारांवरील हल्ले निषेधार्ह असल्याचे म्हणत ट्रोल करणाऱ्यांसाठी राजकीय पक्षांनी लोक पाळली असल्याचे राज म्हणाले. त्यांना महिन्याला पैसे मिळतात. हे निरुद्योगी लोकं आहेत. त्यांना कामधंदा नाही. त्यांचं एकच काम आहे. मोबाईल हातात घेतला की मार याच्या आणि घाल बोटं, अशा शेलक्या शब्दांत राज ठाकरे यांनी ट्रोलर्सचा समाचार घेतला.

आता पत्रकार उघडपणे मंत्र्यांकडे काम करतात

यावेळी राज ठाकरेंनी अनेक पत्रकार मंत्र्यांकडे उघडपणे काम करत असल्याचेही सांगितले. तसेच सध्या अनेक पत्रकार तर बिनकामाचे असून, असे असतानाही ते मुख्य हुद्द्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपूर येथील किस्सा सांगितले. ते म्हणाले की, नागपूरला गेलो तेव्हा मला लाज वाटली. पत्रकारांना विचारलं तर म्हणाले मी या मंत्र्यांकडे, तो त्या मंत्र्यांकडे असल्याचे सांगत होते. आधी हे लपूनछपून चालायचं, आता उघडपणे पत्रकार मंत्र्यांकडे कामं करत आहेत. त्यामुळं पुढचा परिसंवाद हा पत्रकारिता सुधारावी यासाठी घ्यायला हवा असेही राज यांनी यावेळी सांगितले.

Tags

follow us