Ram Mandir : अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरात ( Ram Mandir ) श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानिमित्त देशभर विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम भक्तिमय, आनंदमय, वातावरणात निर्माण झाले आहे. त्यामध्ये असाच एक विश्व विक्रमी कार्यक्रम बाणेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवकेंद्राच्या वतीने रविवारी (दि.21) आयोजित करण्यात आला.
‘२ दिवसांत हल्लेखोरांना अटक करा, नाही तर…’; रामभक्तांवर झालेल्या हल्यानंतर प्रताप सरनाईक आक्रमक
बाणेर येथील रायकर फार्म, सर्व्हे नंबर 126, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया जवळ, प्रभावी टेक पार्क शेजारी, बाणेर, पुणे या ठिकाणी अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 50 फूट उंच व 40 फूट रुंद या आकाराची सर्वात मोठी विश्व विक्रमी निमंत्रण पत्रिका साकारण्यात आली आहे. याची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. विश्व विक्रमाचे प्रमाणपत्र अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजक बी. के. डॉ. दीपक हरके, बी. के. डॉ. त्रिवेणी दीदी, बी. के. डी. सुवर्णा दीदी यांना प्रदान करण्यात आले.
बी. के. डॉ. दीपक हरके यांचा हा 183 वा विश्व विक्रम
या विश्वविक्रमी निमंत्रण पत्रिकेचउद्घाटन करताना बी. के. डॉ. त्रिवेणी यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जरी अयोध्येत होणार असली तरी, त्याची सकारात्मक ऊर्जा अवघ्या जगभर पसरली आहे. परमात्मा ने जो आपल्याला सत्य मार्ग सांगितला आहे, त्या भावनात्मक आणि श्रेष्ठ मार्गाचे आचरण करून आपण सर्व रामामय होऊ शकतो. यातून निर्माण होणाऱ्या राम भक्ति भावाने आपण स्वास्थ्य आणि शांती प्राप्त करू शकतो. आज जरी आपण अयोध्येत प्रत्यक्ष जात नसलो तरी या कार्यक्रमातून सर्वजण मन आणि आत्म्याच्या रूपाने अयोध्येत आहोत.
श्रीराम मंदिरानंतर आता अयोध्येत साकारणार भव्य मस्जिद; मुस्लीम पक्षकारांकडून तारखेची घोषणा
स्वागत, प्रास्ताविक करताना आयोजक बी. के. डॉ. दीपक हरके यांनी सांगितले की, आपण सर्वजण प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या द्वारे शिकविल्या जाणाऱ्या ध्यान धारणेच्या नियमित अभ्यासाने श्रीरामा सारखे दिव्य गुण धारण करुन स्व परिवर्तनाने विश्व परिवर्तन करुन खरे राम राज्य जगात आणू शकतो. असे डॉ.दीपक हरके यांनी सांगितले.