रामलल्ला विराजमान, दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आरती वेळ अन् प्रसिद्ध ठिकाण

रामलल्ला विराजमान, दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आरती वेळ अन् प्रसिद्ध ठिकाण

Ayodhya famous place : 500 वर्षांची प्रतीक्षा संपून रामलला आता अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) विराजमान झाले आहेत. त्यामुळे राम भक्तांच्या (Ram Mandir) आनंदाला पारावार उरला नाही. सर्वत्र जय श्री रामचा नारा घुमत आहे, संपूर्ण भारत रामभक्तीत तल्लीन झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा विधीवत पार पाडली. आता उद्यापासून म्हणजेच 23 जानेवारीपासून राम मंदिर अधिकृतपणे भाविक आणि सर्वसामान्यांसाठी खुले (Ayodhya Tourist Plan) होणार आहे.

अशा परिस्थितीत, तुम्हीही अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अयोध्येला कसे पोहोचायचे, रामललाच्या दर्शनासाठी योग्य वेळ कोणती, आरतीची वेळ कोणती असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. अयोध्येतील राम मंदिराव्यतिरिक्त इतर कोणत्या ठिकाणी जाऊ शकता? पाहूया…

तिकीट अगोदर बुक करावे लागेल
जर तुम्ही राम मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मंदिर परिसरात जाण्यासाठी आगाऊ तिकीट बुक करावे लागेल. खरं तर, कोविड -19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे सध्या केवळ मर्यादित लोकांनाच रामललाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात आहे. यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट (SRJTKT) srjbtkshetra.org च्या अधिकृत वेबसाइटवरून भाविक त्यांचे तिकीट ऑनलाइन बुक करू शकतात. तिकीट बुक करताना, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तारीख आणि टाइम स्लॉट निवडू शकता.

जय सिया राम! 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान, PM मोदींच्या हस्ते पूजा, पाहा फोटो

याशिवाय मंदिराजवळील अयोध्या राम मंदिर अभ्यागत केंद्रात जाऊनही तुम्ही ऑफलाइन तिकीट मिळवू शकता. हे केंद्र दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत सुरू असते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही तिकिटांसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

भेट देण्याची हीच योग्य वेळ
राम मंदिर सकाळी 7 ते 11:30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार आहे. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी हे वेळ लक्षात ठेवा. तर, जर तुम्हाला राम आरतीमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर श्रृंगार आरतीची वेळ सकाळी 06:30, भोग आरतीची वेळ दुपारी 12:00 आणि संध्या आरतीची वेळ 07:30 आहे.

Ram Mandir Ayodhya: पाऊले चालती अयोध्येची वाट! कंगणाने घेतली बाबाची भेट, पाहा फोटो

अयोध्येला कसे पोहोचायचे?
तुम्ही बस, ट्रेन किंवा विमानानेच अयोध्येला पोहोचू शकता. उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बस अयोध्या आणि लखनऊ, फैजाबाद आणि गोरखपूर यांसारख्या शेजारील शहरांदरम्यान नियमितपणे धावतात. जर तुम्ही ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्ही ‘अयोध्या धाम जंक्शन’ वर पोहोचू शकता.

दिल्ली, लखनऊ, वाराणसी, प्रयागराज आणि गोरखपूर येथून थेट ट्रेन धावतात. या सर्वांशिवाय तुम्ही विमानाच्या मदतीने अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचू शकता. याशिवाय लखनऊ आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अयोध्येसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. लखनऊ आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अयोध्या सुमारे 130 किलोमीटर अंतरावर आहे, यासाठी विमानतळावर टॅक्सी आणि बस सहज उपलब्ध आहेत.

Ayodhya : ते खास 84 सेकंद…; प्राणप्रतिष्ठापनेसाठी 1.24 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या वैशिष्ट्य

या ठिकाणांनाही भेट द्या
राम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही कनक भवन, सरयू घाट, मोती महल, तुलसी स्मारक भवन, छोटी छावनी, त्रेता ठाकूर मंदिर, बहू बेगम का मकबरा, गुलाब बाडी, नागेश्वरनाथ मंदिर आणि हनुमान गढीलाही भेट दिली पाहिजे.

दरम्यान, कनक महालापासून देखील सुरुवात करू शकता. असे मानले जाते की श्रीरामाशी विवाह झाल्यानंतर राणी कैकेयीने हा महल माता सीतेला भेट म्हणून दिला होता. हा महल माता सीता आणि रामजी यांचा वैयक्तिक राजवाडा आहे. यानंतर तुम्ही सरयू घाटावर जाऊ शकता. सरयू नदीचे दर्शन घेऊन त्यात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, अशीही एक श्रद्धा आहे. अशा वेळी रामलालाचे दर्शन घेतल्यानंतर सरयू नदीत स्नान करावे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube