Ayodhya : ते खास 84 सेकंद…; प्राणप्रतिष्ठापनेसाठी 1.24 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या वैशिष्ट्य
Ayodhya Prampratisthapana Muhurta : अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir )अगदी काहीवेळात रामलल्ला विराजमान होणार असून, प्राणप्रतिष्ठापनेसाठी विशेष मुहूर्ताची निवड करण्यात आली आहे. याशिवाय प्रभू रामांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्य शहर(Ayodhya City) दहा लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या 1.24 मिनिटांच्या मुहुर्तात 84 सेकंद अत्यंत शुभ आहेत. या शुभ मुहूर्ताचे काय खासियत आणि महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया.
काशीचे ज्योतिषी पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी शुभ मुहूर्त निवडला आहे. शुभ वेळ 12:29:20 ते 12:30:32 पर्यंत असेल. सर्व शास्त्रीय परंपरांचे पालन करून अभिजीत मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. जो दुपारी 12:29:08 ते 12:30:32 पर्यंत असेल.
प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे वैशिष्ट्य
पंचांग आणि इतर शुभ आणि अशुभ योग लक्षात घेऊन, अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशा हे 24 जानेवारी, 2402 रोजी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आला असून, पौष महिन्याची तिथी आहे. ही शुभ वेळ 12:29 मिनिटे 08 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंद म्हणजेच 84 सेकंद अशी असेल. यावेळी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे.
राम मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होणार असून, 23 जानेवारीपासून मंदिर सर्वसमान्य जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमासाठी मोदींशिवाय देश-विदेशातील विशेष पाहुणे मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येत विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
राजकारणी मंडळींशिवाय बॉलिवूडमधील कलाकरांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यात बिग बी, माधूरी दिक्षित-नेने, अनिल अंबानी, सायना नेहवाल यांच्यासह अनेक मंडळी सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहे.