Download App

Ravindra Dhangekar म्हणाले चंद्रकांत पाटलांना पुणेकरांचं काही घेणं देणं नाही

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.त्याचवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवरही (Chandrakant Patil)निशाणा साधला आहे. वेताळ टेकडीवरुन केलेल्या प्रश्नावर आमदार धंगेकर म्हणाले की, भाजपची दुटप्पी भूमिका आहे. पुण्यामध्ये मेधाताई कुलकर्णी टेकडीच्या बाजूने आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे काही पुणेकर नाहीत. त्यांना पुणेकरांचं काही घेणं देणं नाही. त्यांना पुण्याची नाळ माहित नाही. अन् आमचं पुणे उद्ध्वस्त करुन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सरपंच ते पाचवेळा मुख्यमंत्री, प्रकाश सिंह बादलांचा थक्क करणारा प्रवास

याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, मी काल सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. तेथील तालुकाध्यक्षाचा वाढदिवसही होता. त्यावेळी अनेक नागरिक त्या ठिकाणी जमले होते. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. त्या ठिकाणी अनेक स्थानिक पत्रकार जमले होते. त्यावेळी पत्रकारांनी मला विचारलं की, अजितदादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं म्हटल्यावर मी त्यांना म्हणालो की, अजितदादा महाराष्ट्राचे नेते आहेत, माझेही नेते आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांचं काम आहे. त्यांची महाराष्ट्राशी नाळ जोडलेली आहे. त्यांनी मला विचारलं की, अजितदादांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल, तर मी असं म्हटलं की, दादांनाच काय कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे.

अजितदादा मुख्यमंत्री झाले तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल. भाजपला शह द्यायचा असेल तर महाविकास आघाडीने एकत्र लढलं पाहिजे, असंही यावेळी त्यांनी सांगितले. जनतेमध्येही तसा आवाज आहे की, महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढल्या पाहिजेत. भाजपची हुकूमशाहीचं राजकारण थांबवण्यासाठी एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत.

लोकशाहीला घातक असं भाजप जे काही राजकारण करत आहे, त्यावर मात करण्यासाठी महाविकास आघाडीनं एकत्र निवडणुका लढल्या पाहिजेत. असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

वेताळ टेकडीवरुन केलेल्या प्रश्नावर आमदार धंगेकर म्हणाले की, भाजपची दुटप्पी भूमिका आहे. पुण्यामध्ये मेधाताई कुलकर्णी टेकडीच्या बाजूने आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे काही पुणेकर नाहीत. त्यांना पुणेकरांचं काही घेणं देणं नाही. त्यांना पुण्याची नाळ माहित नाही. अन् आमचं पुणे उद्ध्वस्त करुन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Tags

follow us