Download App

Ravindra Dhangekar : आंदोलन मागे, सरकारकडून चौकशी करून कारवाईचे आश्वासन

  • Written By: Last Updated:

पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजप पैसे वाटत आहे. पोलीस भाजपचे कार्यकर्ते झालेत, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस स्टेशन भाजपचे कार्यालये झाली आहेत. त्यामुळे पोलिसांकडून न्याय मिळत नाही, त्यामुळे संविधानिक मार्गाने, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसल्याच त्यांनी सांगितलं होत. जोपर्यंत नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं धंगेकर यांनी सांगितलं होत.

यावर प्रशासनाकडून रवींद्र धंगेकर यांना चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी ते उपोषण मागे घेतले आहे. काँग्रेस जेष्ठ नेते मोहन जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली

हेही वाचा : Ravindra Dhangekar : मला जेलमध्ये टाका, गोळी मारा, पण आमच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका

 

उपोषणाला बसून स्टंटबाजी

उपोषणाला बसून स्टंटबाजी करुन धंगेकर प्रचार करत आहेत. त्यामुळे प्रचार संपला असताना असं काही कृत्य करुन चर्तेत राहण्याचा प्रयत्न आहे. भाजप धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे.

सोबतच विरोधी पक्षाच्या उमेदवाराने स्वतःच्या प्रचारासाठी खोटे आरोप करून उपोषण करून नागरीकांची दिशाभूल करत आहेत. त्याबद्दल त्यांना बाप्पानी सद्बुद्धी द्यावी या करता दगडूशेठ गणपतीची महाआरती आयोजित केली असल्याची माहिती दिली.

दरम्यान भारतीय जनता पक्षानं पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यामुळे ते आज उपोषणाला बसले होते. कसबा मतदार संघातील कसब गणपती मंदिरासमोर हे उपोषण सुरु होत. उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या उपोषणाला अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

Tags

follow us