Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या त्यांच्या शिक्षणावरून विरोधकांकडून त्यांना चांगलं ट्रोल केले जात आहे. मात्र ट्रोलिंग दरम्यान महायुतीचे मंत्री असलेले छगन भुजबळ हे रवींद्र धंगेकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांचे शिक्षण कमी असताना देखील त्यांचे काम मोठे आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
माध्यमांशी संवाद साधत असताना भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला की, काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार यांना त्यांच्या शिक्षणावरून ट्रोल केले जात आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की, एकदा बोलले ठीक आहे. मात्र ट्रोलिंग करण्याची गरज नाही. कारण राजकारणात ज्यांचे शिक्षण अतिशय कमी आहे त्यांनी देखील चांगले काम केले आहेत. जसे की वसंत दादा पाटील त्यांनी अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जास्त क्रांती घडवून आणली.
Arvind Kejriwal यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये होणार रवानगी?
आजचे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांनीच आणले आहेत. नाहीतर महाराष्ट्रातील लोकांना बेळगाव किंवा दक्षिण भारतात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जावे लागत होतं. तसेच वसंतदादा त्यांनी सहकाराच्या बाबतीतही काम केलं. त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न नाही काम किती मनापासून करतो. यावर सगळे अवलंबून आहे. नाहीतर काही लोक पोस्ट ग्रॅज्युएशन पण करतात परदेशातून शिक्षण देखील घेऊन येतात. मात्र ते देखील फेल होतात.
‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ सिनेमानं चार दिवसांत कमावले किती कोटी? बजेटचा आकडा आहे खूपच मोठा
दरम्यान सध्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेले पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरून विरोधकांकडून त्यांना चांगलं ट्रोल केले जात आहे. सोशल मिडीयावर तशा प्रकारचे बॅनर व्हायरल होत आहेत. या बॅनरमध्ये धंगेकर यांच्या शिक्षणाचा उल्लेख असलेला उमेदवारी अर्ज देण्यात आला आहे. त्यांचा फोटो देण्यात आला आहे.
त्यावर लिहिण्यात आले आहे की, मविआचा अशिक्षित उमेदवार, रवींद्र धंगेकर फक्त 8 वी पास, शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित असं म्हणत त्यांना ट्रोल केलं जात आहे. मात्र यावर महायुतीचे मंत्री असलेले छगन भुजबळ यांना विचारण्यात आले असता ते रवींद्र धंगेकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांचे शिक्षण कमी असताना देखील त्यांचे काम मोठे आहे.
तर धंगेकर म्हणाले आहेत. माझी जनतेमध्ये पीएचडी झाली असून त्याचे प्रमाणपत्र जनतेकडून मिळालं आहे. विरोधक माझ्या शिक्षणावर आले आहेत म्हणजे त्यांचा पराभव दिसतोय असे धंगेकर म्हणाले आहेत….