Ravindra Dhangekar म्हणतात पालकमंत्र्यांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही… पाटील म्हणतात, त्यांना पोहे दिले…!

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नवनिर्वाचित कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पहिल्याच लोकप्रतिनिधीच्या बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले. बैठक सुरू असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्याकडे पाहिले देखील नाही, असे सांगत आमदार धंगेकर हे बैठकीत तून निघून गेले तर चंद्रकांत पाटील म्हणतात त्यांना मी पोहे खाऊ घातले. मला वाटलं त्यांना […]

Chandrakant Patil Ravindra Dhangekar

Chandrakant Patil Ravindra Dhangekar

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नवनिर्वाचित कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पहिल्याच लोकप्रतिनिधीच्या बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले. बैठक सुरू असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्याकडे पाहिले देखील नाही, असे सांगत आमदार धंगेकर हे बैठकीत तून निघून गेले तर चंद्रकांत पाटील म्हणतात त्यांना मी पोहे खाऊ घातले. मला वाटलं त्यांना फोन आला म्हणून ते फोनवर बोलत बाहेर गेलेत. ते बैठकीतूनच निघून गेले हे मला आता तुमच्याकडूनच कळत आहे. त्यामुळे वादाचा कोणताही विषय नाही. उद्या धंगेकर यांनी मला घरी जेवायला बोलावले तरी जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुणे बाजार समिती रणधुमाळी सुरू : अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा ‘सामना’ रंगणार – Letsupp

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज बोलावलेल्या बैठकीत भाजपचे महापालिका गटनेते गणेश बिडकर आले होते. ते लगेच गेले. त्यानंतर रवींद्र धंगेकर हे फोनवर त्यांच्या मागे बाहेर पडले. मला वाटलं त्यांना फोन आला म्हणून ते बाहेर गेले आहेत. नंतर मला कोणीतरी सांगितले की ते निघून गेले आहेत. बैठकीत त्यांना मी पोहे खाऊ घातले. तेव्हा ते व्यवस्थित होते. त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. फोन आला म्हणून ते बाहेर गेले. पण ते नाराज असल्याचे मला कसे कळणार. त्यांनी किमान बैठकीत सांगायला पाहिजे होते की कशामुळे नाराज आहे.

रवींद्र धंगेकर यांना तुम्ही कसबा पोटनिवडणुकीत कोण धंगेकर असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तुम्ही अजून नाराज आहात का, असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, पोटनिवडणूक होऊन आता धंगेकर आमदार झाले आहेत. रात गई बात गई, असे म्हणत त्यावर बोलणे टाळत मी ते विसरलो आहे. उद्या जरी मला रवींद्र धंगेकर यांनी घरी जेवायला बोलवले तर आनंदने जाईल, अशी देखील मिस्कील टिपणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

(230) Eknath Shinde | राहुल गांधी यांची लायकी आहे? | LetsUpp Marathi – YouTube

Exit mobile version