रविंद्र धंगेकर यांनी काही दिवसांपासून पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहाराचा मुद्दा उचलून धरला आहे. धंगेकर यांनी या प्रकरणात पुण्याचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. धंगेकरांच्या या भूमिकेमुळं भाजप नेत्यांनी तक्रार केल्याच्या चर्चा सुरु आहेत. धंगेकर यांनी पुन्हा एक पोस्ट करत नवा इशारा फोडला आहे.
पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात स्टेटस्को; धर्मादाय आयुक्तांनी असा निर्णय का घेतला?
रविंद्र धंगेकर यांची एक्स पोस्ट
शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.
आणि पुन्हा एकदा सांगतो…
भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. रविंद्र धंगेकर यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा देताना पुण्यातील सर्वपक्षीयांना आवाहन केलं आहे. समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त व्हा, असं आवाहन रविंद्र धंगेकर यांनी केलं आहे.
रविंद्र धंगेकर यांच्याकडून घेण्यात येत असलेल्या भूमिकांबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धंगेकरांच्या बॉस सोबत बोलेन असं म्हटलं होतं. दरम्यान, रविंद्र धंगेकर यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काही काळ रविंद्र धंगेकर यांच्याकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली नव्हती.
शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.
आणि…
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 22, 2025