रुनवाल एंटरप्रायझेसला दिलासा! उच्च न्यायालयाकडून पुणे जिल्हा न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द

Runwal Enterprises ने पुणे जिल्हा न्यायालयाचा सिव्हिल मिसलेनिअस अर्जातील अंतरिम आदेश उच्च न्यायालयामध्ये रद्द करून घेण्यात यश मिळवले.

Bombay High Court

Bombay High Court

Relief for Runwal Enterprises! High Court quashes Pune District Court’s interim order : रुनवाल एंटरप्रायझेस ब्रिज वॉटर रियल्टी LLP चे रणजीत दारक यांनी पुणे जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या सिव्हिल मिसलेनिअस अर्जामध्ये मिळवलेला अंतरिम आदेश बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये आव्हान देत तो रद्द करून घेण्यात यश मिळवले आहे. पुणे जिल्हा न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार, मौजे लोहेगाव, ता. हवेली येथील वादग्रस्त मालमत्तेबाबत रुनवाल एंटरप्रायझेसला व्यवहार करणे, हस्तांतरण करणे, असाइनमेंट देणे किंवा कोणताही तारण/चार्ज निर्माण करणे तसेच तृतीय पक्षाचा हक्क निर्माण करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र Bombay High Court ने हा आदेश रद्द केला आहे.

रुनवाल एंटरप्रायझेसबाबत वरिष्ठ वकिलांनी न्यायालयात पुढील बाबी मांडल्या :

पुणे जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सिव्हिल मिसलेनिअस अर्जाबाबत रुनवाल एंटरप्रायझेसला कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. न्यायालयाने सुनावणीची नोटीस न देता किंवा रुनवाल एंटरप्रायझेसला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी न देता एकतर्फी (Ex-parte) आदेश दिला. संबंधित एकतर्फी आदेशामध्ये पुणे जिल्हा न्यायालयाने कोणतीही कारणे नोंदवलेली नव्हती. अर्जामध्ये अशी कोणतीही तातडीची परिस्थिती नव्हती की ज्यामुळे ब्रिज वॉटर रियल्टी LLP चे रणजीत दरक यांच्या बाजूने तत्काळ दिलासा देणे आवश्यक होते. ब्रिज वॉटर रियल्टी LLP ही संस्था वादग्रस्त मालमत्तेच्या प्रत्यक्ष ताब्यात नसल्याने त्या मालमत्तेबाबत सर्वसमावेशक तात्पुरता मनाई आदेश (Temporary Injunction) देण्याचा त्यांना अधिकार नव्हता.

Viral Video : बी.टेक इंजिनिअरची बोलती बंद! महिना ७५ हजार कमवणाऱ्या रिक्षाचालकाची तुफान चर्चा

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर बॉम्बे उच्च न्यायालयाने पुणे जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द करत वादग्रस्त मालमत्तेबाबत सध्यस्थिती कायम ठेवण्याचे (Status Quo) निर्देश दिले. दरम्यान, रणजीत दारक आणि *नितीन चव्हाण (ब्रिज वॉटर रियल्टी LLPचे भागीदार) तसेच मीनादेवी सतीश मित्तल, आशिष सतीश मित्तल, कविता अंकुश अग्रवाल आणि नितीन सतीश मित्तल (स्व. सतीश मित्तल यांचे वारस) यांच्या विरोधात *Economic Offences Wing मार्फत मुंबई चेंबूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत खालील कलमान्वये नोंदवण्यात आला आहे :

* कलम 318 (4) – फसवणूक (Cheating)
* कलम 61 (2) – गुन्हेगारी कट (Criminal Conspiracy)
* कलम 3 (5) – समान उद्देशाने गुन्हा करण्याचा आरोप (Common Intention)

घसरणीनंतर शानदार कमबॅक; सेन्सेक्स 192 अंकांनी वधारला तर निफ्टी 23,400 च्या वर

या कलमांनुसार कमाल ७ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. तसेच रुनवाल एंटरप्रायझेस Enforcement Directorate ला पत्र पाठवून रणजीत दारक, नितीन चव्हाण (ब्रिज वॉटरचे भागीदार) तसेच स्व. सतीश मित्तल यांचे कथित वारस यांनी केलेल्या कथित फसवणुकीबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि सर्वंकष चौकशी करून लागू कायद्यांनुसार आवश्यक कारवाई करण्याची मागणी त्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version