Rescue Operation : वारजेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास; धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

पुणे : एनडीए परिसरा नजिक असलेल्या वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याचे आज सकाळी लक्षात आले. काही जणांना तो एका पत्र्याच्या शेडमध्ये जाताना दिसला. ही बातमी काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. बिबट्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अगोदर जाताना दिसला. तेथून तो […]

Nagarhole_Kabini_Karnataka_India,_Leopard_September_2013

Nagarhole_Kabini_Karnataka_India,_Leopard_September_2013

पुणे : एनडीए परिसरा नजिक असलेल्या वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याचे आज सकाळी लक्षात आले. काही जणांना तो एका पत्र्याच्या शेडमध्ये जाताना दिसला. ही बातमी काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी झाली होती. बिबट्या एका पत्र्याच्या शेडमध्ये अगोदर जाताना दिसला. तेथून तो वांजळे यांच्या गार्डनमध्ये गेला. त्यानंतर तो पुन्हा परत कडबा कुट्टी मशीनमधील एका वाहनाखाली बराच वेळ लपला होता.

त्यानंतर मशीन जवळील एका गोदामात तो गेला. बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यु टीम आणि वारजे पोलीस घटनास्थळी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी मोठी जाळी गोदामाच्या दरवाजाच्या जवळ लावली. पण बिबट्याने तेथून पळ काढला.
त्यानंतर एका इमारतीच्या बाजूला असलेल्या झाडात तो दिसला. तेव्हा वन विभागाच्या पथकाने सकाळी सव्वा नऊ वाजता डॉट मारुन त्याला बेशुद्ध केले.

Share Market : आठवड्याच्या सुरूवातीलाच गुंतणुकदार चिंतेत; सेन्सेक्स 600 अंकानी गडगडला 

बिबट्याला पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे पोलीस आणि रेस्क्यु टिमला, ऑपरेशन करणे अवघड जात होते. सुदैवाने बिबट्याला पकडण्यात लवकर यश मिळाल्याने कोणावरही त्याने हल्ला केला नाही.

Exit mobile version