Download App

Pune Crime : मध्यरात्री धुमश्चक्री! पोलीस-कोयत्या गँगचा एकमेकांवर गोळीबार, 5 जणांचा पोबारा

Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्याची सांस्कृतिक राजधानी त्याचबरोबर विद्येचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. मात्र या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान कोयता गँगकडून थेट पोलिसांवरच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तब्बल 9 ते 10 जणांच्या टोळक्याकडून वारजे माळवाडी परिसरात पोलिसांवर गोळीबार झाल्याची माहिती पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. (Robbers Firing on Pune Police increase in Pune Crime )

शरद पवारांना श्रीकृष्ण म्हणणाऱ्या, प्रदीप गारटकरांची राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (7 जुलै) मध्यरात्री एकच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट 03 चे अधिकारी व कर्मचारी कोंबिंग ऑपरेशन करत होते. शहरातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये हे कोंबिंग ऑपरेशन सुरू होतं. त्यावेळीच रोझरी स्कूलच्या जवळ आठ ते दहा इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.

ED चा मनीष सिसोदियांना दणका, तब्बल 52 कोटींची संपत्ती जप्त

या संशयित आरोपींना सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार व युनिट तीनचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलीस पथकाच्या दिशेने पिस्तुल रोखले. त्यानंतर आरोपींनी पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस पथकाने आरोपींच्या दिशेने फायरींग केले.

यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने पोलीस शिपाई कट्टे यांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर 5 आरोपींना पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर इतर चार ते पाच आरोपी यांच्यावर पोलिसांकडून फायरिंग केली असता ते आरोपी अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींचा शोध चालू आहे. तसेच नमूद घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. हे टोळकं कोयत्या गँगमधून असल्याची माहिती आहे.

Tags

follow us