Download App

Rohit Pawar : चिंचवड निवडणूक ही केवळ भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होणार

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा व चिंचवड निवडणूक या पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. यातच भाजप, राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवार अशी ही निवडणूक तिरंगी होईल असे असताना आमदार रोहित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. चिंचवड निवडणूक ही दुरंगी होणार असून जगताप विरुद्ध काटे नसून ही दोन पक्षातील लढाई आहे. म्हणूनच चिंचवड निवडणूक ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

कसबा – चिंचवड निवडणुकांच्या प्रचारासाठी आता नेतेमंडळी मैदानात उतरले आहे. यातच महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पिंपरीमध्ये आले आहे. यावेळी त्यांनी काटे यांना निवडून द्यावे असे आवाहन मतदारांना केले आहे.

चिंचवड निवडणूकमध्ये तिरंगी लढत होईल असे विचारण्यात आले असता आमदार रोहित पवार म्हणाले, ही लढत तिरंगी नसून केवळ दोन पक्षाच्यामध्ये होणार असून यामध्ये भाजपा व राष्ट्रवादीमध्ये ही लढत होणार आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे उभे राहिले आहेत मात्र गेल्या वेळी त्यांना राष्ट्रवादीमुळे मतदान झाले. तसेच वंचितचा पाठिंबा अपक्ष, बंडखोर राहुल कलाटे यांना मिळाला असला तरी याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे भाजपला होण्याची शक्यता आहे. म्हणून वंचितचा फारसा काही फरक या निवडणुकीत दिसून येणार नाही. तसेच राष्ट्रवादीचा उमेदवार या निवडणुकीत मोठ्या मताने निवडून येतील हे तुम्ही पहा, असे आमदार पवार म्हणाले आहे.

राहुल कलाटे यांनी विश्वासघात केला
गेल्या वेळीस राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. मात्र त्यांनी विश्वासघात केला व लोक हा विश्वासघात विसरत नाही. त्यामुळे आमच्या नेत्यांच्या तोंडातून वारंवार कलाटे यांचा उल्लेख होत असेल असेही आमदार रोहित पवार म्हणाले आहे.

Maharashtra Politics : चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीसाठी Ajit Pawar आणि पंकजा मुंडे आज आमने- सामने

ही लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रवादी…
या निवडणुकीत जगताप विरुद्ध काटे अशी नाही आहे तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी आहे. हे दोन पक्षातील भांडण आहे. यामुळे ही निवडणूक तिरंगी नसून केवळ दोन पक्षांमधील आहे. तसेच या निवडणुकीमध्ये विजय हा राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचाच होणार आहे, असे ठाम दावा पवार यांनी केला आहे. : Chinchwad election will be only BJP vs NCP

Tags

follow us