Download App

तीन दिवसात कारवाई करा अन्यथा…; रोहित पवारांचा विद्यापीठ प्रशासनाला इशारा

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. एबीव्हीपीच्या काही सदस्यांनी विनाकारण हल्ला केल्याचा आरोप स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यींनी जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केलं.

ललित पाटीलला पळवून लावण्यात डॉक्टरचा हात असेल असं….; ससूनच्या डीननं स्पष्टचं सांगितलं… 

भाजप कार्यकर्ते आणि डाव्या विद्यार्थी संघटना यांच्यात राडा झाल्यानंतर आज रोहित पवारांनी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी कुलगुरूंची देखील भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या भाजप तसेच अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.

कुलगुरूंची भेट घेलत्यानंतर माध्यमांशी बोलतांना रोहित पवार यांनी सांगितलं की, आज काही डाव्या विचारांच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना घेऊन कुलगुरूंची भेट घेतली. विद्यार्थींनींवर ज्यांनी हात उचलला, त्यांच्यावर अद्याप विद्यापीठाने कारवाई केली नाही. मात्र, त्यांच्यावर पुढच्या तीन दिवसात कारवाई केली जाईल, असं आश्वा्सन कुलगुरूंनी दिलं. आठ तारखेपर्यंत कारवाई करू असं विद्यापीठ प्रशासनाने सांगितलं असल्याचं रोहित पवार म्हणाले.

ते म्हणाले, आठ तारखेपर्यंत कारवाई झाली नाही तर आम्ही सोमवार आंदोलन करणार. शिवाय, विधानसभा अधिवेशनात या विषयावर आवाज उठवणार…. दोन महिन्यापूर्वी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची काही विद्यार्थ्यांनी तोडफोड केली असून अद्याप त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. सभागृहाची तोडफोड करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल करत त्यांनी कारवाईची मागणी केली.

दरम्यान, दोन संघटनांमधील राड्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी यांच्याविषयी भिंतींवर आक्षेपार्ह मजकुर लिहिण्यात आला. एबीव्हीपीने आंदोलन केलं. यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींविषयी ज्याने आक्षेपार्ह मजकूर लिहिला, त्यांच्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. कुठल्याही राजकीय पक्षाने विद्यापिठात दडपशाही करू नये. यासाठी काही नियम बनवले जावेत, असंही रोहित म्हणाले.

 

Tags

follow us