Pune SFI ABVP: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एस एफ आय कार्यकर्त्यावर हल्ला..

Pune SFI ABVP: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एस एफ आय कार्यकर्त्यावर हल्ला..

Pune SFI ABVP: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार राडा झाला आहे. (Pune University) स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या संघटनेकडून विद्यापीठामध्ये संघटनेी सदस्य नोंदणी सुरू होती. त्यावेळी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. अभाविपने आमच्या सदस्य नोंदणीमध्ये अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला जात आहे.

या हाणामारीमध्ये दोन्ही बाजुचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. विद्यापीठातील हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एसएफआयच्या कार्यकर्त्याला अभाविपचे कार्यकर्त्यांनी खाली पाडून मारत असल्याचे बघायला मिळत आहेत. तर एका अभाविपच्या कार्यकर्त्याला एसएफआयचे कार्यकर्ते काठीने जोरदार मारहाण करताना बघायला मिळत आहे.

Maratha Reservation : नवले पुलावर जाळपोळ; मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल!

या दोन्ही संघटनांमध्ये झालेल्या जोरदार राड्यामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी देखील एसएफआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. एका आमदाराने भारतीय जवानांच्या पत्नीविषयी काढलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी निषेध करणारी पोस्टर लावली होती. ही पोस्टर लावत असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एसएफआयच्या कार्यकर्त्यांना पकडून मारहाण करण्यात आली होती. या घडलेल्या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube