Maratha Reservation : नवले पुलावर जाळपोळ; मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल!

Maratha Reservation : नवले पुलावर जाळपोळ; मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल!

Maratha Reservation : पुण्यातील नवले पुलावर मराठा आंदोलकांनी जाळपोळ केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांकडून 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आंदोलकांनी काल नवले पुलावर प्रवासी वाहतूक थांबवत जाळपोळ केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सिंहगड पोलिस ठाण्यात 10 जणांसह अन्य 400 ते 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली आणि मुंबईत वर्ल्डकप सामन्यांदरम्यान आतिशबाजी नाही, बीसीसीआयचा निर्णय

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर या जाळपोळीच्या घटनेचे लोण राज्यभर पसरले आहे. पुण्यातील नवले पुलावर संतप्त मराठा आंदोलकांनी एकत्र येत आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी मनोज जरांगेंना पाठिंबा जाहीर करत
रस्त्यावर टायर जाळून जाळपोळ केली आहे.

Israel Hamas War : निर्वासितांच्या छावणीवर इस्त्रायलचा एअर स्ट्राईक; 50 जण ठार

मराठा आंदोलकांकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे पूलावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. यावेळी गाड्यांमधील प्रवासी आणि परिसरातील दुकांनांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनाप्रकरणी रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले, योगेश दसवडकर यांच्याह इतर 400 ते 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे. आंदोलकांवर कलम 143 ,147 ,188,341,336 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला.

‘फडणवीसांनी आधी राजीनामा द्यावा’; जाळपोळ घटनेवर एकनाथ खडसेंची सरकारला सुनावलं

दरम्यान, पुण्यातील नवले पुलावर आंदोलकांनी आक्रमक होत टायरची जाळपोळ करत जोरदार घोषणाबाजी केली. जाळपोळीच्या घटनेमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, साताऱ्याकडे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या 6 ते 7 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांमुळे वाहतूक कोंडी झाल्यानंतर ही वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.

आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आले. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने.

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच’; CM एकनाथ शिंदेंचा घणाघात

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात दोन दिवसांपासून तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविला. नेते, शासकीय कार्यालयांना पोलीस बंदोबस्त आहे. त्यानंतर आंदोलकही दगडफेक करत आहे. तसेचही वाहने पेटवून देत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube