‘फडणवीसांनी आधी राजीनामा द्यावा’; जाळपोळ घटनेवर एकनाथ खडसेंची सरकारला सुनावलं

‘फडणवीसांनी आधी राजीनामा द्यावा’; जाळपोळ घटनेवर एकनाथ खडसेंची सरकारला सुनावलं

Eknath Khadse Vs devendra Fadnvis : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलेलं असतानाच मराठा तरुणांकडून जाळपोळ करण्यात येत आहे. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Nilesh Lanke : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार लंकेंचे मंत्रालयाबाहेर उपोषण

एकनाथ खडसे म्हणाले, आज महाराष्ट्रात जे घडतं आहे ते सर्वजण उघड्या डोळ्याने पाहत आहेत. जाळपोळमध्ये आमदार, खासदारांची घरे, सरकारी मालमत्तांची हानी होत आहे. मात्र, या प्रकरणात कुठेही पोलिस आंदोलकांना थांबवताना दिसत नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Maratha Reservation चा आणखी एक बळी; चिठ्ठीत म्हणाला, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी…

राज्यातील कोणत्याही भागात एसआरपी, पॅरा आर्मी फोर्सचा वापर केलेला दिसत नाही. सरकारला कोणतीही ठोस पाऊलं उचलायंची नाहीत. या संपूर्ण घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊन जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

Maratha Reservation : ‘राज्यकर्त्यांना प्रवेशबंदी हे खेदजनक’; पोपटराव पवारांचं फडणवीसांना पत्र

तसेच मागील काळात काहीही झालं तरी सत्ताधारी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आम्ही पाहिले आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती आहे, असा कणकखरपणा फडणवीसांनी दाखवावा, असंही ते म्हणाले आहेत.

Maratha Reservation : ‘…नाहीतर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल’; जाळपोळीवरुन जरांगेंचा कडक इशारा

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. आमदार प्रकाश सोळंके यांचं घरच पेटवून दिल्याचं समोर आलं. त्यानंतर माजलगाव नगरपरिषद, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावल्याचं समोर आलं होतं.

बावनकुळेंच्या सभेत राडा : मराठा तरुणाच्या घोषणा; भाजप कार्यकर्त्यांची पत्रकारांना धक्काबुक्की

या संपूर्ण घटनेवरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना इशाराच दिला आहे. मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेत करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करणार नसून जाळपोळ करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. दरम्यान, जाळपोळीनंतर बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून मॅरेथॉन बैठकाही घेतल्या जात असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका-टीप्पण्या केल्या जात आहेत. एकनाथ खडसे यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube