जरागेंना पवारांचा पाठिंबा, सदावर्तेंचं वक्तव्यं; खडसे म्हणाले, ‘सदावर्तेंची विश्वासार्हता काय?’

  • Written By: Published:
जरागेंना पवारांचा पाठिंबा, सदावर्तेंचं वक्तव्यं; खडसे म्हणाले, ‘सदावर्तेंची विश्वासार्हता काय?’

Eknath Khadse : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी अंतरवली सराटी गावात विराट सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला 10 दिवसात आरक्षण द्या. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही, असा अल्टिमेटम सरकारला दिला. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरागे पाटलांवर निशाणा साधला. काल त्यांनी जरागेंना अटक करण्याची मागणी केली तर आज शरद पवारांनीच त्यांना पाठिंबा दिला, अशी टीकाही केली. यावर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) जोरदार पलटवार केला.

पाकिस्तानचे कंबरडे मोडले अन् बुमराहची टॉप गोलंदाजांच्या लिस्टमध्ये धडक 

काल गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटलांना अटक करावी, कारण अंतरवली सराटी गावात जी सभा आयोजित केली, त्यात हिंसाचार होऊ शकतो, असं विधान केलं होतं. याविषय़ी एकनाथ खडसेंना विचारलं असता ते म्हणाले की, आज जरांगेंनी आपल्या भाषणात म्हटलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेच मराठा समाजाला उचकावत आहेत, असा गंभीर आरोप केला. जरागे पाटलांनी अतिशय जबाबदारीने हे विधान केलं आहे. त्यांच्या विधानात तथ्य असू शकतं. त्यामुळं त्यांनी हे विधान केलं. आता जरांगे पाटील खरं बोलत आहेत की सदावर्ते खरं बोलतात, हे तपासावं लागले.

सदावर्ते हे अनेक आरोप करताहेत. अनेक विधान त्यांनी केला आहे. पण, सदावर्ते यांची विश्वासार्हता काय? असा टोलाही त्यांनी लगावला.

खडसे म्हणाले, पोलिसांनी त्यांची चौकशी करावी. हिंसक घटना घडत असतील तर असं सदावर्ते जर म्हणत असतील तर ते सदावर्ते यांनाच माहीत, त्यांना अशी माहिती कुठून मिळाली? असा सवालही त्यांनी केला.

यावेळी बोलतांना त्यांनी गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, सरकारमधले आदरणीय संकट मोचक गिरीश महाजन हे आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आंदोलनस्थळी संकटमोचक म्हणून गेले होते. त्यानंतर मंत्रीमंडळही तिथं गेल. त्यामुळं सरकार दरबारी हा प्रश्न येऊन सुध्दा आतापर्यंत सुटलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काल उदयनराजे यांनी बोलतांना शरद पवारांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असं विधान केलं. राजकारणातून निवृत्त होण्याचं वय ठरवावं, असं ते म्हणाले. यावरही खडसेंनी भाष्य केलं. ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्ष असतं. त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व राजकारण्यांचा निवृत्तीचा निर्णय शासनाने घ्यावा. उदयनराजे हे सरकारमध्ये असल्यानं त्यांनी 60 वर्षानंतरच्या सर्वांन राजकारणातून निवृत्त करण्याच्या निर्णयाबाबत सरकारकडे आग्रह धरावा. त्यांच्या विनंतीला सरकार नक्की मान देईल. उदयनराजे यांचं वय हे साठपेक्षा जास्त आहे. त्यामुळं त्यांनीही राजकारणातून निवृत्त व्हावं, असा खोचक टोला खडसेंनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube