Nilesh Lanke : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार लंकेंचे मंत्रालयाबाहेर उपोषण

Nilesh Lanke : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार लंकेंचे मंत्रालयाबाहेर उपोषण

Nilesh Lanke : राज्यात (Maharashtra)मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)मुद्दा चांगलाच पेटला आहे. राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन आपला राजीनामा (Regignation)दिला आहे. तर, काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन (special session)बोलावण्याची मागणी केली आहे.

Maratha Reservation : आरक्षणासाठी राजीनामा सत्र सुरूच…; ठाकरे गटाच्या नगरसेविकेनं दिला राजीनामा

आता, मंत्रालयाबाहेर तीन आमदारांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. त्यामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा देखील सहभाग आहे. आमदार लंके यांच्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार राजू नवघरे यांनी उपोषण सुरु केले आहे.

Sensex; दोन दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स पुन्हा घसरला, पण गुंतवणूकदारांचे भांडवल वाढले

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता लढा अधिक तीव्र होऊ लागला आहे. यातच सकल मराठा समाजाच्यावतीने लोकप्रतिनिधींना गावबंदी केली जात आहे. दरम्यान काही लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेऊन आरक्षणाच्या मागणीला तसेच उपोषणाला पाठिंबा दिला जात आहे. यातच अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसले आहे.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार राजू नवघरेंनी मंत्रालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आलं आहे.

त्यामुळे आरक्षणाचा हा लढा अधिकच तीव्र होताना दिसत आहे. यातच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर येत्या काळात होणारे हिवाळी अधिवेशन आम्ही उधळून लावू, असा इशारा देखील आमदार निलेश लंके यांनी दिला होता.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राज्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहे. काही ठिकाणी आमदारांचे घर जाळण्यात आले.

राजकीय पक्षांचे कार्यालय फोडण्यात आले. एसटीवर दगडफेक झाली, एसटी बस पेटवण्यात आली. महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. यातच नगर शहरात देखील नगर सोलापूर मार्गावर टायर जालन्यात आले, रास्तारोको करण्यात आला. तसेच नगर-संभाजीनगर महामार्गावर देखील रास्तारोको करण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube