Download App

पुणे मेट्रो लाईन 2 साठी 3626 कोटी रुपये मंजूर; मोदी सरकारचे पुणेकरांना गिफ्ट

Pune Metro Line : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पुणेकरांना आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली

  • Written By: Last Updated:

Pune Metro Line : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पुणेकरांना आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो लाईन 2 योजनेसाठी (Pune Metro Line) 3626 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच या बैठकीमध्ये आणीबाणीबाबतचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर आणीबाणीच्या काळात लढलेल्या योद्ध्यांचाही सन्मान करण्यात आला. तर दुसरीकडे या बैठकीत पुनर्वसनासाठी झरिया कोलफिल्ड- सुधारित मास्टर प्लॅनलाही मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी 5940 कोटी रुपये खर्च केले जातील. याशिवाय उत्तर प्रदेशात आग्रा आंतरराष्ट्रीय पोटॅटो सेंटरची स्थापना केली जाईल. ते बांधण्यासाठी 111.5 कोटी रुपये खर्च येईल.

पुणे मेट्रो लाईन 2 योजनेसाठी 3626 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हा खर्च केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था समान वाट्याने करणार आहे. या प्रोजेक्टमध्ये दोन नवीन कॉरिडॉर जोडले जाणार आहे. वनाज ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब).

13 नवीन स्थानके

एकूण 12.75 किमी लांबीच्या या नवीन मेट्रो लाईनमध्ये 13 नवीन स्थानके असणार आहे. ही स्थानके चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली सारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना जोडतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा विस्तार मेट्रोद्वारे पुणे शहराच्या पूर्व आणि पश्चिमेला थेट जोडेल, ज्यामुळे पौडे रोड आणि नगर रोड सारख्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी होईल.

मोठी बातमी, वर्षातून दोनदा होणार दहावीच्या परीक्षा; CBSE ने दिली मान्यता

महामेट्रो बांधकाम काम करणार

या प्रकल्पाच्या बांधकाम आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीमशी संबंधित सर्व कामे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ची जबाबदारी असणार आहे. सध्या या प्रोजेक्ट अंतर्गत स्थलाकृतिक सर्वेक्षण आणि डिझाइनिंगसारखी प्राथमिक कामे आधीच सुरू झाली आहेत.

follow us