Download App

पुण्यात तीन दिवस RSS ची बैठक; राष्ट्रीय अन् सामाजिक मुद्द्यांवर होणार खलबतं

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यात उद्यापासून (दि.14) तीन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैककीत 36 संघटनांचे 266 प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, राष्ट्रीय आणि सामाजिक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. (RSS Meeting In Pune)

‘बोलून मोकळं व्हायचं’ म्हणत अडचणीत सापडलेल्या CM शिंदेंसाठी बावनकुळेंची बॅटिंग

आंबेकर म्हणाले की, आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. दरवर्षी समन्वय बैठक आयोजित केली जाते. गेल्या वर्षीची बैठक छत्तीसगडमधील रायपूर येथे झाली होती.

सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेले प्रयत्न, जीवनमूल्यांच्या आधारावर कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न, स्वदेशी विचारावर आधारित आर्थिक धोरण, त्याचबरोबर जातिभेद संपुष्टात येईल असा समरसतापूर्ण व्यवहार अशा अनेक विषयांवर या तीन दिवसांत विचारविनिमय होणार आहे.बैठकीत सहभागी होणार्‍या सर्व संघटना संघप्रेरित असून सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात त्या स्वायत्तरितीने कार्य करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार असून, त्यांचे अनुभव बैठकीत मांडले जाणार आहेत.

Maratha Reservation बद्दल सरकार सुरुवातीपासूनच संवेदनशील; ‘त्या’ व्हिडीओवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण…

सरसंघचालक मोहन भागवत राहणार उपस्थित
पुण्यात आयोजित या बैठकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुण कुमार, रामदत्तजी चक्रधर हे सर्व सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Tags

follow us