‘बोलून मोकळं व्हायचं’ म्हणत अडचणीत सापडलेल्या CM शिंदेंसाठी बावनकुळेंची बॅटिंग

  • Written By: Published:
‘बोलून मोकळं व्हायचं’ म्हणत अडचणीत सापडलेल्या CM शिंदेंसाठी बावनकुळेंची बॅटिंग

पुणे : सर्वपक्षीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यानचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्य सरकरला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर, शिंदेंचा व्हायरल होणारा व्हिडिओ खरा असेल तर, महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या सर्वांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मैदानात उतरत CM शिंदेंसाठी बॅटिंग करत त्यांना
वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

Maharashtra : 6 महिन्यांत 10 शहरांत धार्मिक तणाव; सोशल मीडिया की समाजविघातक प्रवृत्ती जबाबदार?

बावनकुळे म्हणाले की, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये शिंदे आपण बोलून मोकळं व्हायचं असे म्हणत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, शिंदे ज्यासाठी बोलले तो विषय मराठा आरक्षणाचा नव्हता असे बावनकुळेंनी म्हटले आहे. आम्ही नागपूरवरून आलो होतो. दुसऱ्या विषयावर बैठक सुरू होणार होती असे सांगत फडणवीस आणि शिंदे वेगळ्या विषयावर बोलत असल्याचे सांगत बावनकुळेंनी शिंदेंचा बचाव केला आहे.

अंतरवाली सराटीत फडणवीस अनुपस्थित?

दुसरीकडे, अंतरवाली सराटी येथे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज (दि.13) संध्याकाळी जाणार असल्याचे सांगितले जात आहेत. मात्र, या भेटीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव नसल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. यावर बावनकुळेंनी स्पष्टिकरण दिले आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राजस्थानमध्ये आहेत. फडणवीस जाणार नाही म्हणजे वेगळा अर्थ काढायचे कारण नाही. मराठा आरक्षण दिले पाहिजे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे.

अजित पवारांच्या आमदाराचा लेटर बॉम्ब; थेट PM मोदींना पत्र लिहित शिंदे-फडणवीसांची तक्रार

तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून

मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकारेंनी जोरदार समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. त्या त्यांनी म्हटले आहे की,  “बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्य मुख्यमंत्री ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता? खरतर हीच ती गद्दार वृत्ती! गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतंय. ह्या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार??? दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलं असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube