Download App

Kasba By Poll : गिरीश महाजन यांचा गुंडांसोबत प्रचार, रूपाली पाटील भडकल्या

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यातील कसबा निवडणूक चांगलीच गाजू लागली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी देखील सुरु आहे. यातच कसबा पोटनिवडणुकीत प्रचारात भाजप नेते गिरीश महाजन गुन्हेगारांसोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला. जर मंत्रीच गुन्हेगारांसोबत प्रचार करत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं रुपाली पाटील म्हणाल्या.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे पुण्यातील कसबा पेठ (Pune Bypoll Election) विधानसभा पोटनिवडणुकीत गुंडांना सोबत घेऊन प्रचार करत आहे. असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी केला आहे.

पुण्यातील संदीप मोहोळ खुन प्रकरणात ज्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यापैकी संतोष लांडे हा सध्या जामिनावर बाहेर आहे आणि त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे.

दरम्यान संतोष लांडे याने गिरीश महाजनांसोबत प्रचार करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले आहेत, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.

ठोंबरे म्हणाल्या, राज्यात भाजपचं सरकार असून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे. त्यामुळे हिटलर शाही सुरु आहे. एकीकडे गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र भाजप प्रचारासाठी गुन्हेगारांचा वापर करत आहे. हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे. ज्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे अशांना सोबत घेत भाजप प्रचार करत असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे.

जय भीम फेम सूर्या अन् सचिन तेंडुलकरची ग्रेट भेट, सोशल मीडियावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव

दरम्यान कसबा पोटनिवडणूक मविआ आणि भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातच आजारी असलेले गिरीश बापट देखील व्हील चेअरवर थेट प्रचार मैदानात उतरले आहे. यावरूनच भाजपसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे हे स्पष्ट होत आहे.

Tags

follow us