मोठी बातमी : चाकणकरांना डिवचणं भोवलं; रूपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

रूपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. 

मोठी बातमी : चाकणकरांना डिवचणं भोवलं; रूपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

मोठी बातमी : चाकणकरांना डिवचणं भोवलं; रूपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

NCP removes spokesperson Rupali Thombare Patil after her criticism of Rupali Chakankar : अजित पवारांच्या पक्षात अखेर भाकरी फिरली असून, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वादाच्या परिणामांचा निकाल समोर आला असून, रूपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्याशिवाय अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. ठोंबरे यांच्याकडून पदभार काढून घेतल्यानंतर आता हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. तर मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे पायउतार व्हावे लागलेल्या सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चाकणकरांवरील विधानांवरून मिळाली होती नोटीस

फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन रुपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती.  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील दोन्ही रूपालींचा वाद चर्चेचा विषय ठरला होता. ठोंबरे यांच्याकडून चाकणकरांवर करण्यात येणाऱ्या विधानांबाबत पक्षाकडून त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्यावर आपण सात दिवसात खुलासा देऊ असे ठोंबरे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. पण पाटील ठोंबरे यांचा खुलासा येण्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने नियुक्त केलेले प्रवक्ते कोण? 

अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर,आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले,  प्रतिभा शिंदे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर, श्याम सनेर, शशिकांत तरंगे, प्रशांत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन चिटणीस म्हणून संजय तटकरे तर, आनंद परांजपे हे संपर्कासाठी प्रदेश कार्यालयामध्ये उपलब्ध राहणा आहेत. वरील प्रमाणे केलेल्या नियुक्त्यांव्यतिरिक्त यापूर्वी केलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत असेही राष्ट्रवादी पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकार स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version