Video : …तर सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी सोहळा पार पडेल; भुजबळांनी सांगितल्या घडामोडी

Ajit Pawar यांच्या अकाली जाण्याचा धक्क्यातून आम्ही कोणीच सावरलेलं नाही. दादा आमच्यातच आहे असं वाटतं. या शोकमग्न अवस्थेत आम्ही आहोत.

  • Written By: Published:
Video : ...तर सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी सोहळा पार पडले; भुजबळांनी सांगितल्या घडामोडी

Chhagan Bhujbal On New NCP DCM Name : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याअपघाती निधनानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव सातत्याने पुढे येत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या मोठे संकेत देत सूचक विधान केले आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद द्यावं असे अनेकांचे मत आहे आणि ते चूक आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे जर सगळं एकमत झालं तर, उद्याच्या उद्या शपथ विधी सुद्धा होऊ शकतो असे भुजबळ यांनी म्हटले आहे. ते राष्ट्रवादीच्या पक्षकार्यालयात आले असता माध्यमांशी बोलत होते.

Ajit Pawar Plane Crash : टेबल टॉप रनवे धोकादायक का? बारामतीतील घटनेनंतर चर्चेला फुटलं तोंड

भुजबळांनी नेमकं काय सांगितलं?

दादा ज्या पद्धतीने गेले त्यामुळे झोप उडाल्यासारखी झालं आहे. पण जबाबदारी देऊन हे चालवलं पाहिजे. विधान मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांची उद्या मीटिंग बोलवली आहे. यात सेल्फ लीडर (पक्ष प्रमुख) आपण म्हणतो ते पद देण्यासंदर्भात चर्चा होईल. सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावं असं अनेक मत आहे आणि ते चूक आहे असं मला वाटत नाही. उद्याची मीटिंग हे पक्षाचा प्रमुख नेता कोण हे ठरण्याची आहे म्हणजेच विधिमंडळ पक्ष प्रमुख ठरवण्याचा मीटिंग आहे त्यामुळे बैठकीत सगळं एकमत झालं तर, उद्याच्या उद्या शपथ विधीसुद्धा होऊ शकतो असे भुजबळांनी सांगितले आहे. आज आमच्यासमोर सीएलपी लिडरची नेमणूक करणे म्हणजेच उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे आधी प्राधान्य काय आहे की सीएलपी नेमणे. त्यामुळे त्यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू असल्याचेही भुजबळांनी यावेळी सांगितले. Chhagan Bhujbal On New NCP DCM Name

दादा…तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट

आम्ही अद्याप दुःखातून सावरलो नाही – तटकरे 

भुजबळांच्या आधी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माध्यमांशी बोलताना आम्ही अजून दादांच्या अकाली जाण्याचा धक्क्यातून आम्ही कोणीच सावरलेलं नाही. दादा आमच्यातच आहे असं वाटतं. या शोकमग्न अवस्थेत आम्ही आहोत. आज त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणं माझ्यासाठी क्लेशकारक आहे. ज्या कार्यालयात पक्षाचं संघटन उभं केलं, तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याच्या भावनेतून मी इथे आलो होतो असे ते म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांशी भेट जरूर झाली. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीत आहे. त्यानंतर आम्ही कुटुंबाशी संपर्क करू. जनतेच्या मनातील मत, आमदारांच्या मनातील मत या सर्वांवर बोलू. सुनेत्रा वहिनींशी बोलणंही महत्त्वाचं आहे. दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला. त्यांच्या दुखद निधनाने राज्य शोकमग्न आहे. त्याच शोकाकूल वातावरणात आम्ही आहोत. बाकीच्या विषयावर चर्चा नाही.’ दरम्यान, या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री कोण हे ठरण्याची शक्यता  असल्याचे तटकरेंनी सांगितले.

 

 

follow us