Rupali Thombre on Swargate Rape Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका प्रवासी 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची (Swargate ) धक्कादायक घटनेवर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे संबंध संमंतीने झाले. पैशाच्या व्यवहार होता अशा प्रकारचं विधान केलं आहे.
Video : स्वारगेटवरील खळ्ळखट्याक वसंत मोरेंच्या अंगलट येणार?; अजितदादांनी दिले संकेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्वारगेट बसमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून हा प्रकार घडल्याचा दावा वकिलांनी केला त्यानंतर आता रूपाली पाटील यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर याबाबत एक पोस्ट केली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “पुणे शिवाजी कोर्टात बस स्टँड मधील आरोपीला आणायच्या वेळी डीसीपी गिल साहेब यांनी माझीच चौकशी केली. तसंच, मॅडम तुम्ही आंदोलन करणार असाल, आरोपीला काळ फासणार असाल तर प्लीज करू नका. त्याचवेळी साहेबांना सांगितलं घटनेची खरी माहिती घेऊन त्याची प्राथमिक माहिती खरी असल्याची खात्री केल्याशिवाय मी बोलतही नाही आणि कोणतच आंदोलन मी करणार नाही. तुम्हाला विश्वास नसेल तर तुमच्या सोबत थांबते. मला कोर्टात रिमांड रिपोर्ट पहायचा आहे. केसची माहिती घेणं केसचा स्टडी करणं गरजेचे आहे, असंही त्यांनी पुढे लिहिले आहे.