Sachin Ghaywal : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून सचिन घायवळ फरार होता. आज पुणे पोलिसांनी त्याला राजस्थानातून अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन घायवळ याला राजस्थानातील (Rajasthan) सिकर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सचिन याच्या विरोधात हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमक्या देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या सचिनवर (Sachin Ghaywal) पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात (Warje Police Station) 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ तसेच वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खाजगी कंपनीतील संचालक महिलेकडून ही खंडणी उकळण्यात आली होती.
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
यानंतर सचिन विरोधात मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. आज पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला राजस्थानातील सिकर जिल्ह्यातून अटक केली आहे.
तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये ; ‘या’ ठिकाणी 13 लाखांचा भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त-
