पिंपरी चिंचवडमध्ये साईबालाजी एजुकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा मनीष मुंदडा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराने प्रेरित होऊन रुबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला 117 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे प्रेमासाठी करणार ‘काहीतरी वेगळे’
या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळणार आहे, हीच या कार्यक्रमाची खरा उद्देश आहे. रक्तदान शिबिरासाठी रुबी हॉल क्लिनिकच्या रक्तपेढीचे तज्ञ डॉक्टर व वैद्यकीय पथक उपस्थित होते. त्यांनी रक्तदात्यांची आरोग्य तपासणी करून सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन केले. रक्तदानाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृतीपर मार्गदर्शनही करण्यात आले.
रक्तदान केल्याने कोणतीही शारीरिक हानी होत नाही, उलट आरोग्यास फायदेच होतात, याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अनेकांनी प्रथमच रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचा अभिमान व्यक्त केला. शिक्षक व कर्मचारी वर्गानेही पुढाकार घेत प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.मनीष मुंदडा संस्थापक अध्यक्ष साईबालाजी एजुकेशन सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
