रविंद्र धंगेकरांच्या आरोपांवरून समीर पाटील आक्रमक; पत्रकार परिषदेत केला मोठा दावा

धंगेकर यांच्या आरोपांना आता समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाल उत्तर दिले.

Ghaywal

Ghaywal

शहरातील कोथरुडचा गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन (Pune) राजकारण चांगलंच तापलं असून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी थेट भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य केलं आहे.रविंद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करत समीर पाटील हे कोथरुड मधील गुन्हेगारी चालवत असल्याचा आरोप केला. तसंच, समीर पाटील यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा फोटो पुढे करत गंभीर आरोपही केले आहेत. त्यावर आता समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाल उत्तर दिले. तसंच, 50 लाख रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा त्यांनी धंगेकर यांच्यावर आपण करणार असल्याचंही आज म्हटलं आहे.

समीर पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, मला काही खुलासे करायचे आहेत. ते आठ दिवसांपासून माझं नाव घेत आरोप करत आहेत. त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात कामाला आहे का? त्याचा त्यांच्याकडे पुरावा नाही. मी मोक्का मधील गुन्हेगार आहे? त्याचा पुरावा नाही. मला सांगावं वाटत की आरोप करण्याआधी पुरावे गोळा करून आरोप करायचे असतात.

घायवळ आणि भाजपची मिडिया! रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत थेट नावंचं घेतले

यानंतर समीर पाटील यांनी एक व्हिडिओ दाखवला. यानंतर पाटील म्हणाले की, ‘यात सागर गवसणे इसम आहे, हा कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे माहिती नाही. याच्यावर धाराशिव, नगर , जामखेड , शिवाजीनगर इथे गुन्हे दाखल आहेत. 2009 पासून 25 पर्यंत 9 गुन्हे आहेत. 13 तारखेला गोळीबार झालेली आहे. मी या इसमाला ओळखत नाही. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला फोन केलेला नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर पाटील यांनी मी मोक्कामधील आरोपी आहे हे सांगितलं. मी अशा लोकांना उत्तर देणार नाही. धंगेकर म्हणतात माझ्यावर पण गुन्हे आहेत, मी त्यांना उत्तर का देऊ. मी तर स्वच्छ आहे. कोथरुडकरांनी ठरवाव आता गुन्हेगारांना पाठीशी कोण घालत आहे. माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केली आहे. अब्रु नुकसानीचा 50 कोटींचा दावा दाखल केला आहे, अशी माहिती समीर पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version