Download App

Sanjay Kakade यांना दणका : कर्ज थकल्याने संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

मुंबई : माजी राज्यसभा खासदार तथा भाजपचे (MP) प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. डएचएफएल बँकेचे (DHFL Bank) थकीत कर्ज न फेडल्याने बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने कर्ज प्रकरणी संजय काकडे यांचा पुण्यातील शिवाजीनगर येथील राहता बंगला जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या फक्त बंगला ताब्यात घेण्याचे आदेश दिले असून पुढील आदेशाची वाट पाहण्यास सांगितले आहे. येत्या २७ मार्चला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

Ajit Pawar : कृषिमंत्र्यांनी ‘तारे’ तोडायला नको होते, अवकाळीचा मुद्द्यावरून अजित पवार संतापले

संजय काकडे यांनी आपल्या स्थावर मालमत्ता विविध बँकांककडून कर्ज घेतले आहे. परंतु, संजय काकडे यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केलीच नाही. त्यामुळे बँकांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. आय. छागला यांनी हे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने संजय काकडे यांचा पुण्यातील शिवाजीनगर भागातील शिवाजी गृहनिर्माण संस्था येथील सर्वे नंबर १०३, प्लाँट नंबर ६२ येथील बंगला जप्त करण्याचा आदेश मंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, तात्पुरत्या स्वरुपात हा बंगला ताव्यात घ्यावा आणि पुढील आदेशाची वाट पाहावी, असे देखील उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतची पुढील सुनावणी येत्या २७ मार्च रोजी होणार आहे.

संजय काकडे यांनी विविध मालमत्ता गहाण ठेवून डीएचएफएल बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, कर्जाची परतफेड न केल्याने कोर्ट रिसिव्हरने आदेशाची अंमलबजावणी केली आहे. मालमत्तेच्या विक्रीबाबत संबंधित बँकेशी सल्लामसलत करण्याचे आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणी विस्त्रा आयटीसीएल (इंडिया) लिमिटेडने माजी खासदार संजय काकडे आणि इतरांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

डीएचएफएल बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने संजय काकडे यांच्या मालकीचा यशवंत घाडगे नगर येथील बंगला आणि शिवाजीनगर येथील शिवाजी हौसिंग सोसायटीमधील ७,४४० चौरस फुटांचा भूखंड ताब्यात घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

यशवंत घाडगे नगर, एबीएल हाऊसच्या मागे विद्यापीठ रस्त्यावरील शिवाजीनगर येथील संपत्तचा उल्लेख करण्यात आले आहेत. संजय काकडे यांनी अ‍ॅड. शिवाजी हाऊसिंग प्रॉपर्टी बंगला आणि एबीएल हाऊसमागील स्थावर मालमत्ता लोक मंगल सहकारी बँक, इंडिया बुल हाऊसिंग फायनान्स आणि समता नागरी सहकारी बँकेकडे गहाण ठेवल्याचे गौरव जोशी यांनी उच्च न्यायालयात सांगितले. विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज) रस्ता येथील अशोक पथ लेन येथील काकडे पॅराडाईजसाठी न्यायालयाने जप्तीचे आदेश दिले आहेत. गौरव जोशी यांनी उच्च न्यायालयात याबाबत सांगितले.

Tags

follow us