Ajit Pawar : कृषिमंत्र्यांनी ‘तारे’ तोडायला नको होते, अवकाळीचा मुद्द्यावरून अजित पवार संतापले

  • Written By: Published:
Ajit Pawar : कृषिमंत्र्यांनी ‘तारे’ तोडायला नको होते, अवकाळीचा मुद्द्यावरून अजित पवार संतापले

राज्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण बिघडले आहेत. काल राज्यातील काही भागात गारपीट झाली आहे. फळबागांचे, पालेभाज्यांच मोठं नुकसान झाले. पुढील आठवडाभर अनेक भागात पावसाची शक्यता सांगितली आहे. आज देखील हवामान खराब आहे. पण यावर सरकार संवेदनशील आहे की नाही, हे कळायला भाग नाही. अशी टीका आज विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी विधानसभेत केली.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसापूर्वी अवकाळीने शेतीचे फार नुकसान झाले नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर देखील अजित पवार आक्रमक झाले. ते म्हणाले अवकाळीने शेतीचे फार नुकसान झाले नाही, असे तारेही त्यांनी तोडले. इकडे राज्याचे मुख्यमंत्री कोणाचेही फोन उचलतात, असे व्हिडीओ फिरतात पण वाचाळ मंत्री मात्र शेतकऱ्यांची कुचेष्ठा करतात. अशी टीका त्यांनी केली.

राज्यावर पुन्हा घोंगावतेय कोरोनाचे संकट; केंद्राने उचलले महत्वपूर्ण पाऊल

काल गालिचा पसरावा असा गारांचा थर पडला होता. अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहणार आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्यावर शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं ? असा प्रश्न अजित पावर यांनी विचारला. त्यात सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. त्यामुळे अधिकारी बांधावर जात नाहीत. अशामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळेल, तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. अशी परिस्थिती त्यांनी सभागृहात मांडली.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कलेक्टर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. त्यांचा अहवाल येतो आहे. मागील काळात देखील आपण मदत केली होती. भविष्यात देखील आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.

https://www.youtube.com/watch?v=7EZp9IFrVIU

follow us
  • fb
  • instagram
  • youtube