Download App

कामं होणार नसतील महापालिकेचे आयुक्तचं बदला, संजय काकडेंची चंद्रकांतदादांकडे मागणी

Sanjay Kakade : महापालिका स्थापन झाल्यापासून आपण तीसचा आकडा पार केला नव्हता पण सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आपण 98 पर्यंत पोहोचलो होतो. पुण्याच्या आयुक्तांना आपणच मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे एकतर आयुक्त बदला किंवा त्यांच्याकडून कामे करुन घ्या. नगरसेवकांचीच काम होत नसतील तर सत्ता असून नसल्यासारखे असेल, अशी मागणी भाजप नेते संजय काकडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

ते म्हणाले काही माझ्याकडे अनेक नगरसेवक येतात. त्यांची तक्रार असते की आमचे कामं होत नाहीत. नगरसेवकांची कामं झाले नाहीत तर ते निवडून येणार कसे? त्यांच्या वार्डात लोकसभा किंवा विधानसभेला लीड घेणार कसे? अशी तक्रार संजय काकडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

आपल्या नगरसेवकांची पदे जाऊन दोन वर्षे झाले. आजही जनेतेला वाटत नाही की नगरसेवकांची पदे गेली आहे. त्यांना नगरसेवक म्हणूनच त्या भागातील जनता अपेक्षित असलेली कामे सांगतात. दुर्देवाने आत्ता आपले 32 ते 34 नगरसेवक उपस्थित आहेत. एकूण आपले 98 नगरसेवक आहेत. ते आज का आले नाहीत याबद्दल त्यांना विचारणा झाली पाहिजे, अशी मागणी संजय काकडे यांनी नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडे केली.

मोदींच्या कार्यक्रमाला प्रत्येक मतदारसंघातून 2 हजार कार्यकर्ते आणा; मुरळीधर मोहोळ यांच्या सूचना

आपल्या पुण्यात अनेकांनी शिफारशीवर पद उपभोगली आहेत पण धीरज घाटे त्यांच्यापैकी नाहीत. ते स्वत:च्या कर्तुत्वार मोठे झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन नावे सांगितले होते त्यामध्ये घाटेंचे देखील नाव होते. या तीन नावापैकी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत जाऊन काम करणारे नाव म्हणजे धीरज घाटे आहेत. त्यामुळे धीरज घाटे सर्वांना न्याय देतील, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला.

मोदीजींना विधानसभा, लोकसभा देणार, शहराध्यक्ष होताच धीरज घाटेंनी केला संकल्प

धीरज घाटेंनी अध्यक्ष म्हणून प्रत्येक नगरसेवकाला दर पंधरा दिवसांनी बोलवले पाहिजे आणि त्यांनी सुचविलेली कामे आयुक्तांकडून करुन घेतली पाहिजेत. राज्यात, देशात आपली सत्ता आहे पण 90 टक्के लोकांची कामे होत नाहीत. 10 वेळा कामासाठी जावं लागतं. आयुक्त, स्थानिक आमदारांकडून नगरसेवकांची मोठी हेटाळणी केली जातीय. ह्या नगरसेवकांना उद्या धिरज घाटेंनी किंवा दादांनी बोलावून घेतलं तर ते सांगतील काय परिस्थिती आहे, असे संजय काकडे म्हणाले.

Tags

follow us