मोदींच्या कार्यक्रमाला प्रत्येक मतदारसंघातून 2 हजार कार्यकर्ते आणा; मुरळीधर मोहोळ यांच्या सूचना

मोदींच्या कार्यक्रमाला प्रत्येक मतदारसंघातून 2 हजार कार्यकर्ते आणा; मुरळीधर मोहोळ यांच्या सूचना

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 1 ऑगस्ट रोजी पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदींचा हा पुणे दौरा आहे. या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमाला प्रत्येक मतदारसंघातून 2 हजार कार्यकर्ते आणा, अशी सूचना भाजपचे सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी भाजप (BJP) कार्यकर्यांना दिल्या. (Muralidhar Mohol Prime Minister Narendra Modi Pune taur Bring 2 thousand activist from each constituency)

पुणे शहराचे नव नियुक्त शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा आज भव्य सत्कार सोहळा करण्यात आला. या कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, आज जगातील सर्वात लोकशाही भारत आहे. आणि या देशाचं नेतृत्व पंतप्रधान मोदी करत आहे. मोदीजी ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत, त्या भाजपमध्येही सशक्त लोकशाही आहे. त्यामुळंच एक सामान्य कार्यकर्ता संघटनेतील अनेक महत्वाच्या पदांवर काम करतो. पुणे भाजपचं नेतृत्व आजवर अनेकांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत केलं. आता आपल्यातले कार्यकर्ते असलेले धीरज घाटे हे संघटनेचं नेतृत्व करत आहेत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आमच्यातला कार्यकर्ता सेनापती झाला याचा आनंद झाला. आपल्या समोरचं आव्हानं मोठं आहे.  आता या सेनापतीच्या नेतृत्वात आपल्याला आगामी लोकसभा, विधानसभा जिंकून भाजपचा झेंडा फडकवायाच आहे, असं ते म्हणाले.

मोठा अनर्थ टळला! दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता पीएम मोदींचा दौरा? 

ते म्हणाले, 1 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येतात. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्विकारल्यानंतर ते पोलिस मुख्यालयात शासकीय कामांचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे. त्याासाठी मोदींच्या या कार्यक्रमाला 15 हजार संख्येने उपस्थित राहायंचं आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे, त्यामुळं आपलं काय काम, असा विचार करू नका. पंतप्रधान आपले आहेत. त्यामुळं सर्वांनी या कार्यक्रमाला याचंचं आहे. टिळक पुरस्काराचा कार्यक्रम करून कार्यकर्ते कार्यक्रमाला पोहोचणार नाहीत. त्यामुळे शिवाजीनगर ग्राऊंडवर उपस्थित राहा आणि प्रत्येक मतदारसंघातून 2 हजार कार्यकर्ते आणा, अशी सुचना मोहोळ यांनी केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube