मोठा अनर्थ टळला! दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता पीएम मोदींचा दौरा?
पुणे : पुण्यातून आयसिसच्या संशयित दहशवाद्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात डॉ. अदनान अली सरकारला (Dr. Adnan Ali Sarkar) अटक करण्यात आली. त्यानं अनेक तरुणांना ब्रेन वॉश करून आयसिसच्या नादाला लावल्याचा आरोप होतोय. तपास यंत्रणेनं त्यांच्याकडून आयसिसशी संबंधित महत्वाची कात्रदपत्रे आणि उपकरणं जप्त केली. अदनान अली याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नियोजित पुणे दौरा आणि पुण्यात पकडलेले दहशतवादी याचे काही कनेक्शन आहे का? , पुण्यातील धोका टळला आहे का? याच विषयी पुणे एटीएसचे माजी प्रमुख भानुदास बर्गे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. (Connection between Prime Minister Narendra Modi planned visit to Pune and the arrested terroristst)
पुण्यात दहशवादी पकडले गेले या वृत्तानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणं पसरलं आहे. पुण्यात एक दोन नव्हे, तर अनेक दहशतवादी सापडले. त्यामुळं आता पुणे शहर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची चिंता व्यक्त होत आहे. याविषयी बोलतांना बर्गे यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांचा असं टार्गेट ठरलेलं नसतं. पुण्यात अतिरेकी पकडले हे काही पहिल्यांदाच झालं नाही. जंगली महाराज बाग ब्लास्ट, फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात याआधी स्फोट झालेच. एवढचं नाहीतर, दगडूशेठ हलवाई मंदिरातही बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न झाला. ज्या ठिकाणी अटॅक केल्यानंतर मोठी बातमी होते, तिथं बॉम्बस्फोट घडवूण आणले जातात.
सुरक्षेत मोठी चूक; राज्यपालांच्या ताफ्यावर कारची धडक, दोघांना अटक
दहशत निर्माण करणं, दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करणं, एखाद्या देशाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत कऱणं, परकीय गुंतवणूक येऊ नये या कारणासांठी हे बॉम्बस्पोट घडवले जातात. दहशतवादी हे कधीही पैशांसाठी बॉम्बस्पोट घडवून आणत नसल्याचं बर्गे यांनी सांगितलं.
पीएम मोदी १ तारखेला पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पीएम यांच्या दौऱ्यात काही घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता का? यावर बोलतांना बर्गे यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १ तारखेला येत आहेत. त्यांचा दौरा फार अलिकडच्या काळात ठरला. पकडलेल्या दहशतवाद्यांचा या दौऱ्याशी संबंध आहे, असं अद्याप तपासात आढळून आलं नाही. हाय सेक्यिुरिटी असलेल्या लोकांच्या बाबतीत शक्कतो हल्ला होत नाही. मला वाटतं नाही, या दहशतवाद्यांचा मोदींच्या दौऱ्याशी काही संबंध असेल, असं बर्गे यांनी सांगितलं.
ते म्हणाले, सध्या पुण्यात होणाऱ्या बॉम्बस्पोटांचा धोका टळला आहे. दहशतवाद्यांना पकडलं नसतं, तर केवळ पुण्यातच नाही तर अनेक शहरांमध्ये बॉम्बस्पोट झाले असते. कारण, अनेक ठिकाणांहून दहशतवादी पकडले. खरंतर ही एक चैन आहे. आणि पुणे एटीएसने हे मोड्यूल पूर्ण उद्धवस्त झालं आहे. मात्र, अदनान अली हा आज रेकॉर्डवर नाही. गेल्या दहा वर्षापासून तो रेकॉर्डवर आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं होतं. यांच्यामागे काही संघटना असतात. दिसायला या संघटनांचं काम सामाजिक असतं. पण, पाठीमागून या संघटना या दहशवाद्यांना पाठिंबा देत असतात. अशी संघटना पुण्यातही आहेत, असं खळबळजनक माहिती बर्गे यांनी दिली.
दरम्यान, यावेळी बोलतांनी त्यांनी पुणे पोलिसांचं कौतुक केलं. ते म्हणाले, पोलीस फार चांगल्या प्रकारे काम करत आहेत. गणपतीच्या काळात पोलिसांकडून चांगला बंदोबस्त केला जातो. ज्या दशहवाद्यांना पकडलं, त्यांचा गणपती उत्सोवात काही घातपात करण्याचा प्रयत्न होता का, याची चौकशी करून पोलिसांनी सतर्क राहावं, असा इशाराही त्यांनी दिला.