सुरक्षेत मोठी चूक; राज्यपालांच्या ताफ्यावर कारची धडक, दोघांना अटक

  • Written By: Published:
Arif Mohammad Khan

Governor Arif Mohammad Khan : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकतेच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या सेक्टर 77 मध्ये एका कार्यक्रमातून परतत असताना एका अज्ञात वाहनाने आरिफ मोहम्मद खान यांच्या ताफ्यावर धडक दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

त्या वाहनाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहनाला धडक दिली आहे. तपासात दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. सध्या आरोपीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. सुदैवाने राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कोणतीही इजा झालेली नाही.

मुंबईतील चाबड हाऊसला दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले फोटो

एडीसीपी शक्ती वशिष्ठ म्हणाले की राज्यपाल आपल्या कार्यक्रमातून दिल्लीला परतत असताना सेक्टर 77 मध्ये एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ताफ्याच्या वाहनाला धडक दिली. मात्र टक्कर झाल्यानंतर दोन्ही तरुणांना तेथून पळता न आल्याने पोलिसांनी तात्काळ पकडले.

Photo : न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ

दोन्ही आरोपी गाझियाबादचे असून त्यांचा तपास सुरु आहे. एखाद्या नेत्यांच्या सुरक्षेत अशी कुचराई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. बडे नेते या परिस्थितीतून गेले आहेत. गेल्या वर्षी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील मोठ्या त्रुटीचे प्रकरण समोर आले होते. पीएमचा ताफा 20 ते 25 मिनिटे बीच रोडवर शेतकऱ्यांनी अडवला होता.

Tags

follow us