मुंबईतील चाबड हाऊसला दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले फोटो

मुंबईतील चाबड हाऊसला दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले फोटो

Chabad House : मुंबईतील चाबड हाऊसला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून या घराचा गुगल फोटो सापडला आहे. दोन्ही दहशतवादी राजस्थानमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होते. यानंतर कुलाब्यातील या ज्यू कम्युनिटी सेंटरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

26/11 च्या हल्ल्यापासून टारगेटवर
चाबड हाऊस 26/11 च्या हल्ल्या वेळी दहशतवाद्यांच्या टारगेट होते. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्याकडून चाबड हाऊसची गुगल इमेज सापडली आहे.

या दोन कारणांमुळे चाबड हाऊस टारगेट
26/11 च्या हल्ल्यादरम्यान चाबड हाऊसला दोन कारणांमुळे लक्ष्य करण्यात आले होते. इस्त्रायलला धडा शिकवण्याचे पहिले कारण होते. वास्तविक, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष खूप जुना आहे, पण मध्यपूर्वेतील इस्रायलवर विजय मिळवणे शक्य नव्हते, म्हणून भारतावर हल्ला झाला तेव्हा खास इस्रायलला संदेश देण्यासाठी येथे हल्ला करण्यात आला.

Photo : न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ

दुसरे म्हणजे, अमेरिका, युरोप आणि इस्रायलमधील लोक मोठ्या संख्येने येथे असतात. अशा परिस्थितीत त्यांची हत्या करून त्यांना जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घ्यायचे होते. त्यावेळी मुंबई हल्ल्यात एकूण 174 जणांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.

Rajasthan : गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त ‘लाल डायरी’ची चर्चा; पण हे नेमकं प्रकरण आहे काय?

चाबड हाऊस म्हणजे काय?
चाबड हाऊस हे ज्यू समुदायातील लोकांसाठी एक सामुदायिक केंद्र आहे, जिथे ते आपल्या समुदायातील लोकांना सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षा आणि मदत करतात. मुलांसाठी शिक्षण असो, तरुणांसाठी रोजगार असो किंवा वृद्धांसाठी धार्मिक आणि आरोग्यविषयक मदत असो. एक प्रकारे, चाबड हाऊस हे ज्यू समुदायाचे प्रमुख केंद्र आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube