Download App

Sanjay Raut Notice : नारायण राणेंबद्दल काय म्हणाले बावनकुळे ?

पुणे : २००४ साली खासदारकीच्या (MP Election) निवडणुकीत मी पैसे खर्च करुन संजय राऊतला निवडून आणले, असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला खुद्द नारायण राणे हेच उत्तर देतील. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी सांगितले.

खासदार संजय राऊत यांना २००४ साली मी पैसे खर्च करुन निवडून आणले होते, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली. त्यावर संजय़ राऊत यांनी शुक्रवारी (दि. ३) सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नारायण राणेबद्दल काय बोलावे. राणेना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे ते काय मला खासदार बनवतील. मला आधी बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांनी पद दिले आहे. मात्र, राणेंनी २००४ साली संजय राऊत यांना मी पैसे खर्च करुन खासदार म्हणून निवडून आणले होते, असे म्हणणे हे माझे चारित्र्यहनन आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

याबाबत पुणे दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संजय राऊत-नारायण राणे वादाबद्दल विचारले असता. बावनकुळे म्हणाले की, नारायण राणे जे काही म्हणाले आहेत. त्याचे उत्तर देण्यास ते समर्थ आहेत. मी त्याबाबत अधिक काहीही बोलणार नाही.

Tags

follow us