Kasba Chinchwad Bypoll : पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात (Kasba Chinchwad Bypoll) हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात कमी मतदान होत आहे. या मुद्द्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले,की सध्या जरी मतदान कमी दिसत असले तरी हे पुणे आहे. त्यात आज रविवार आहे. त्यामुळे दुपारनंतर मतदानासाठी रांगा लागलेल्या तुम्हाला दिसतील. तसेच या निवडणुकीत राज्य सरकारचे पाच सहा मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. मंत्री येथे येण्याचे काही गरज आहे का, हा प्रशासनावर एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रकार आहे. पराभव समोर दिसत असला की अशा प्रकारे गोंधळ घालण्याला प्रवृत्त करायचे हा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.
वाचा : Kasba Chinchwad Bypoll : आमदार तांबे म्हणाले, निवडणुकीचा ‘तसा’ परिणाम होणार नाही
ते पुढे म्हणाले, की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आहे असं वारंवार म्हटलं जातं. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा. सावरकरांना भारतरत्न द्या अशी आम्ही मागणी केली की, त्यांच्या तोंडाला फेस येतो.देशात क्रांतीची मशाल पेटवणारे ते महान क्रांतिकारक आहेत. वीर सावरकर यांचा देशात वारंवार अपमान करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करावे अशी मागणी त्यांनी केली.
Kasba Chinchwad By Poll : फडणवीस म्हणाले, लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे
काल शिंदे गटाने कार्यकारिणीत ठराव केला आहे की, मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा.आता केंद्रातील त्यांच्या महाशक्तीचे सरकार आहे.मग ही महाशक्ती मराठीच्या बाबतीत हात आखडता का घेत आहे ? असा सवाल राऊत यांनी केला.बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच मराठी अस्मितेसाठी केली. आता मात्र 5 ते 6 वर्षांपासून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण सुरु आहे हे दुर्दैव आहे.