Download App

” गुंडांना पोलीस ठाण्यात बसवायची नाटक; शिवशाही बसमधील प्रकार दिल्लीतल्या निर्भया कांडसारखाच ”

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला जात असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वारगेट येथील घटना दिल्लीतल्या निर्भया कांडासारखीचं असल्याचे म्हटले आहे. सुदैवाने त्या मुलीचे प्राण वाचले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut On Swargate Deop Rape Case)

‘जीव जळतोय…’ उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंच्या कृतीचं समर्थन, ऑडिओ क्लिप…

…तर सत्ताधाऱ्या पक्षातील महिलांनी गोंधळ घातला असता

पुण्यात जो घृणास्पद प्रकार घडला त्यानंतर महिला नेत्यांनी थातूरमातूर भाष्य केलं. जर दुसरं सरकार असतं तर, या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता. एका महिलेवर जी लाडकी बहीण आहे तुमची तिला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? असा थेट सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

स्वारगेट प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेचा तरुणीवर दोनदा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

महाराष्ट्रात गेल्या अडीच ते तीन वर्षापासून महिला अत्याचारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. महिलांचे अपहरण खून बलात्काराची प्रकरणं वाढली आहेत. गुंडांना महिलांचं वस्त्रहरण करण्याचं लायसन्स दिलं आहे का? पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी विचारले पाहिजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना जाब विचारला पाहिजे, त्यांच्या काळात गुंडगिरी वाढली आहे.

स्वारगेट बस प्रकरण, परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, डेपोतील 23 सुरक्षारक्षक सस्पेंड

गुंडांना पोलीस ठाण्यात बसवायची नाटक चालली आहे, ते बंद करा असा सल्ला देत पुण्यात सर्वात जास्त खंडणीखोरी, पोलिसांची हप्तेगिरी, अपहरण, राजकीय आश्रयाखाली जी गुंडगिरी सुरू आहे त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आश्रय दाते त्यांना अभय असल्याचे राऊत म्हणाले. पोलिसांवर दबाव आहे आणि पोलिस तो दबाव मान्य करतात. स्वारगेटला आमच्या शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केलं, त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होतील. राजकीय कार्यासाठी आपण गृहखात वापरत आहात. सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी गृहखात्यात वापरलं जात आहे.

 

follow us