Download App

पुण्यात शिवसेनेचे किती आमदार निवडून येतील ? संजय राऊतांची सांगितली गॅरंटी

  • Written By: Last Updated:

पुणेः पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत (Sanjay Raut</strong>) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी यांच्या गॅरंटी शब्दावरही संजय राऊतांनी तुफान टोलेबाजी केली. ही टोलेबाजी करत असताना संजय राऊत यांनी शिवसेनेची एक गॅरंटी जाहीर करून टाकली. पुण्याचा खासदार भाजपचा नसेल. पुणे (Pune) शहरात शिवसेनेचे तीन आमदार निवडून येतील, असे राऊत यांनी म्हटले आहे.

पुण्याचे बँकॉक होतेय, तुमचे नवे पालकमंत्री कुठे आहेत ? संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मराठी माणसांचे शौर्य संपविण्याचे प्रयत्न केलाय. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ही त्यांच्या मनामध्ये आसुया आहे. औरंगाबाद हा गुजरातला जन्माला आलाय म्हणून तर औरंगजेबची औलाद महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. ही पिलावळ महाराष्ट्राला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

पत्र लिहून कुणाला वेड्यात काढताय, आम्ही काय डोक्याला गोडं तेल लावतो? अंधारेंनी घेतला फडणवीसांचा समाचार

संजय राऊत म्हणाले, शिवसेना अजिंक्य आहे. फडणवीस आम्हाला शिल्लक सेना म्हणतात. या मेळाव्यात येऊन बघा शिल्लक सेना एेवढी मोठी आहे. तुमच्याकडे फक्त कचरात गेलाय हे लक्षात ठेवा आहे. शिवसेना म्हणजे महासागर आहे. शिवसेना लाट आहे. आणि त्याला कधीच ओहोटी लागत नाही. देवेंद्र फडणवीस या मैदानात शिवसेना कशी पुण्यात आहे एकदा येऊन बघा. आम्हाला शिल्लक सेना म्हणतात. २०२४ मध्ये या महाराष्ट्रात शिल्लक सेना सत्तेवारी येईल.

मोदी खूप गॅरंटी देत असतात. पण शिवसेनेची ही गॅरंटी आहे पुण्यातील किमान तीन आमदार आमचे असतील. पुण्याचा खासदार भाजपचा नसेल ही आमची गॅरंटी आहे. कुठे आहे पनौती. 2024 नंतर पनौती जाईल. 2024नंतर महाराष्ट्राला लागलेली पनौती जाईल. शिवसेनाला लागलेली पनौती जाईल, असेही राऊत म्हणाले.

Tags

follow us